घरपालघर...तर मोठा अपघात झाला असता

…तर मोठा अपघात झाला असता

Subscribe

एकमेव असलेल्या या विहिरीची दुरवस्था झाल्याने सध्या तब्बल ५ ते ६ किलोमीटरहून अधिक लांब असलेल्या शेरीचापाडा या ठिकाणाहून त्यांना पाणी आणावे लागत आहे.

ज्ञानेश्वर पालवे, मोखाडा :  मोखाडा तालुक्यातील निळमाती या गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी असलेली विहीर पहाटे पाच वाजताच्या दरम्यान ढासळल्याने ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ वाढली आहे.निळमाती ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची म्हणून हिच एकमेव विहिर असून यावरच या गावची तहान भागते. मात्र या विहिरीचे संपूर्ण बांधकाम विहिरीत पडून पूर्णतःहि जागाच धसल्याचे दिसून येत आहे. यामुळे याचे बांधकाम पुर्वरत करून पिण्याच्या पाण्याची सोय तात्काळ करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.विहिरीचे पाणी भरण्यासाठी या गावातील महिला या पहाटे ६ वाजल्यापासूनच या विहिरीवर जात असतात. मात्र पहाटे पाच वाजताच ही विहीर ढासळल्याने मोठा अनर्थ टळला आहे. कारण सकाळी सकाळीच एकच गर्दी या विहिरीवर होत असते. या दरम्यान जर ही घटना घडली असती तर अनर्थ घडला असता कारण विहिरीत भरपूर पाणी असून याची खोली जवळपास ३० फुटाहून अधिक आहे. यामुळे सुदैवाने ही घटना टळली आहे.मात्र आता पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव असलेल्या या विहिरीची दुरवस्था झाल्याने सध्या तब्बल ५ ते ६ किलोमीटरहून अधिक लांब असलेल्या शेरीचापाडा या ठिकाणाहून त्यांना पाणी आणावे लागत आहे.

यासंदर्भात ग्रामसेवक ईप्पर यांनी विहिरीची पाहणी करून पंचनामा केला आहे. मात्र पाणीपुरवठा किंवा यासंबंधित प्रशासन मात्र अद्यापही म्हणावे तसे हलले नसल्याने या ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा आता कधी संपणार असा सवाल उपस्थित होत आहे.

- Advertisement -

 

” पहाटे ही विहीर कोसळली यामुळे पिण्याच्या पाण्याची अडचण झाली आहे. आम्हाला लवकर ही विहिर दुरुस्त करून मिळावी अशी आमची मागणी आहे.
-जयराम ठाकरे
सदस्य,ग्रामपंचायत निळमाती/दांडवळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -