घरपालघर...तर निराधारांसाठी काम करावं लागेल!

…तर निराधारांसाठी काम करावं लागेल!

Subscribe

10 ऑक्टोबर या जागतिक बेघरदिनानिमित्त वसई-विरार महापालिकेच्या वसई येथील बेघर निवारा केंद्रात बेघरांसाठी आधारकार्ड कॅम्प व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांनी बेघरांशीही संवाद साधला.

विरार: ‘ईश्वराने आपल्याला मनुष्य अवतार दिला आहे. आपण आपल्यासाठी कर्म करतच असतो; पण त्याचबरोबर हे जीवन सार्थकी लावायचं असेल तर थोडंसं का होईना; निराधारांना आधार देण्याचं काम आपल्याला करावंच लागेल. नैराश्यात असलेल्यांना हळूहळू या सगळ्यातून बाहेर काढावं लागेल. आणि त्यासाठी मला आपल्या सर्वांचं सहकार्य लागेल, अशा शब्दांत वसई-विरार महापालिकेच्या प्रथम महापौर प्रवीणाताई ठाकूर यांनी बेघरांप्रति आपल्या सहवेदना व्यक्त केल्या. 10 ऑक्टोबर या जागतिक बेघरदिनानिमित्त वसई-विरार महापालिकेच्या वसई येथील बेघर निवारा केंद्रात बेघरांसाठी आधारकार्ड कॅम्प व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांनी बेघरांशीही संवाद साधला.

नैराश्यात असलेल्या महिला, तरुण आणि ज्येष्ठांना नैराश्यातून बाहेर काढून त्यांना स्वावलंबी करायचे आहे. त्यांना आधार द्यायचा आहे. त्यासाठी आपण वसई तालुक्यात मोहीमच राबवणार असल्याचे त्या म्हणाल्या. या सगळ्यांना त्यांच्या घरच्यांनी बेघर केले आहे, मात्र वसई-विरार महापालिकेने या निराधारांना आधार देण्याचे स्तुत्य काम केले आहे. या निराधारांकरिता विविध उपक्रम राबवत असल्याबद्दल महापौरांनी पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांचे आभार मानले. तर दीनदयाळ अंत्यदोय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नियंत्रक सुकदेव दरवेशी यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.‘अधिकारी आपली काम करत असतात. पण निराधारांसाठी काम करण्यासाठी हृदयात संवेदना असाव्या लागतात. असे अधिकारी दिवसाचे चोवीस तास काम करत असतात. सुकदेव दरवेशी हे अधिकारी त्यापैकी एक आहेत. मागील चार वर्षं मी त्यांचे काम पाहत आले आहे. त्यामुळे त्यांचे कामाप्रतिचे प्रेम-बांधिलकी मी पाहिलेली आहे,अशा शब्दांत प्रवीणाताई ठाकूर यांनी सुकदेव दरवेशी यांना शाबासकीची थाप दिली. या सगळ्यांना नैराश्यातून बाहेर काढून समाजात वावरण्यायोग्य व्यक्ती बनवाल, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी उपस्थित अधिकार्‍यांकडे व्यक्त केली.

- Advertisement -

पालिकेने या निराधारांसाठी आधार देण्यासाठी, त्यांची ओळख निर्माण होण्यासाठी पालिकेने आयोजित केलेला आधार कार्ड व आरोग्य चाचणीचेही त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रवीणाताई यांच्या हस्ते या निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर शहर व्यवस्थापक रूपाली कदम मॅडम, जेएनयूएलएम नियंत्रक सुकदेव दरवेशी, अधीक्षक नरेंद्र मानकर साहेब, सातीवली आरोग्य केंद्राचे डॉ. दुधमवळ व वालीव नागरी आरोग्य केंद्राचे डॉ. राजेंद्र चव्हाण, वालीव निवारा केंद्राच्या व्यवस्थापक कश्मीरा, निवारा समितीच्या सदस्य आम्रपाली साळवे, जया कदम व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली कदम यांनी केले. तर आभार सुकदेव दरवेशी यांनी मानले.

वसई-विरार शहराला आणखी निवारा केंद्रांची आवश्यकता – सुकदेव दरवेशी

- Advertisement -

वसई-विरार शहराची लोकसंख्या आजघडीला 25 लाखांच्या घरात आहे. प्रति एक लाख लोकसंख्येला एक निवारा केंद्र हवे, असा केंद्र सरकारचा नियम सांगतो. त्यामुळे शहरात आणखी 10 ते 12 निवारा केंद्र निर्माण व्हायला हवी, अशी अपेक्षा जेएनयूएलएम नियंत्रक सुकदेव दरवेशी यांनी प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर यांच्याजवळ व्यक्त केली. गोरगरीबांप्रति सन्माननीय महापौरांच्या सहवेदना राहिल्या आहेत. समाजातील अत्यंत दुर्लक्षित घटकाचे काम असेल तर महापौरांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. गोरगरीबांच्या कल्याणकारी योजनांकरता महापौर मॅडमची भूमिका सहज आणि सकारात्मक राहिली आहे. महापौर पदाच्या त्यांच्या अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांच्या कामाचा मी जवळून अनुभव घेतलेला आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची, त्यांचे मार्गदर्शन घेण्याची मला सुवर्णसंधी प्राप्त झालेली होती, हे माझे सुदैव समजतो. या शहरातील त्या दैवी रूप आहेत, असे मला वाटते. त्यामुळे निराधारांकरिता महापौर मॅडमच्या माध्यमातून आणखी निवारा केंद्रे उभी राहतील, असा विश्वास या प्रसंगी सुकदेव दरवेशी यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -