घरपालघरपालघर जिल्ह्यात उष्णतेत वाढ होण्याची शक्यता

पालघर जिल्ह्यात उष्णतेत वाढ होण्याची शक्यता

Subscribe

पालघर: मागील २ दिवसापासून ३५ ते ३६ अंश सेल्सिअस इतके तापमान राहिल्याने उन्हाच्या झळा जाणवत असून प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने दिलेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात पुढील पाच दिवस कमाल तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सरासरी कमाल तापमान २-३ अंश सेल्सिअसने वाढून २३ ते २७ मार्च दरम्यान अनुक्रमे ३६,३६, ३७, ३७ आणि ३९ अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा इशारा आहे.

त्याबरोबर किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तसेच पुढील तीन दिवस पाच दिवस सरासरी ७-१० किमी प्रति तास वार्‍याची गती राहण्याची शक्यता आहे. तसेच दुपारची आर्द्रतेत कमालीची घट होवून पुढील पाच दिवस दुपारच्या वेळेस १५ ते २३ टक्के आर्द्रता राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे. अशी माहिती कृषि विज्ञान केंद्र, जिल्हा कृषि हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषि हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -