घरपालघरदारू पिऊन गाडी चालवणार्‍यांच्या चुकीला माफी नाही

दारू पिऊन गाडी चालवणार्‍यांच्या चुकीला माफी नाही

Subscribe

वाहतूक पोलिसांनी बोईसर शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी केली. या नाकाबंदीत मद्य प्राशन करुन वाहन चालविणार्‍यांची तपासणी करण्यात आली.

पालघर: इंग्रजी नवीन वर्षाची सुरूवात दरवर्षीच आपल्या देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.हेच निमित्त साधून 31 डिसेंबरच्या मध्यरात्री अनेक मद्यपी जोरदार पार्ट्या करतात.परंतु,त्यांनी दारू प्राशन केल्यावर गाडी चालवणे अनेकदा अपघातांस कारणीभूत ठरते.त्यामुळे असे अपघात होऊ नयेत ही जबाबदारी पोलीस प्रशासनाची असते.यावर्षी देखील पालघर जिल्हा वाहतूक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त जिल्ह्यात ठेवला होता. बोईसर शहरात मद्य प्राशन करुन वाहन चालविणार्‍यांवर कारवाई करण्यात आळी . या कारवाईत २५ पेक्षा अधिक वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.वाहतूक पोलिसांनी बोईसर शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी केली. या नाकाबंदीत मद्य प्राशन करुन वाहन चालविणार्‍यांची तपासणी करण्यात आली.

तसेच 104 मद्यपींवर मीरा- भाईंदर, वसई विरार परिसरात कारवाई करण्यात आली. ३१ डिसेंबरच्या रात्री मीरा- भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत 50 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ५ पोलीस उपआयुक्त, १० सहाय्यक पोलीस आयुक्त, २२५ पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व ७०० पेक्षा जास्त पोलीस अंमलदार, २४८ ट्रफिक वार्डन आणि ४०० मसुबचे कर्मचारी असा बंदोबस्त नेमण्यात आला होता.

- Advertisement -

या कारवाईमुळे शहरांत मद्य प्राशन करुन वाहन चालविण्याच्या घटना कमी होण्यास मदत होईल.तसेच मद्य प्राशन केल्याचे आढळल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल.

– आसिफ बेग,पोलीस अधीक्षक , पालघर जिल्हा वाहतूक विभाग

- Advertisement -

मीरा- भाईंदर पोलिसांची कडक कारवाई

मीरा- भाईंदर पोलिसांनी ’ड्रिंक अँड ड्राईव्ह’ (दारू पिऊन ) वाहने चालविणार्‍यांवर कारवाई करत वाहने जप्त केली आहेत. त्यात २०२३ सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४६ जणांवर कारवाई केली आणि २५ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान ८० जणांवर कारवाई करत दारुड्यांना चांगलाच दणका दिला आहे. तर सर्व पकडलेल्या वाहनांना न्यायालयात जाण्याचे समन्स वाहतूक विभागाकडून देण्यात आलेले आहे. पोलिसांनी जागोजागी लावलेल्या नाकाबंदी व बंदोबस्तात ब्रिथ ऍनालाईजर मशीन द्वारे ३० टक्के पेक्षा जास्त प्रमाण असणार्‍यांवर ’ड्रिंक अँड ड्राईव्ह’ ची कारवाई केली आहे.
सरत्या शेवटी पोलीस आयुक्त मधुकर पांडे , अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक आणि पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी वाहतूक पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एकट्या काशीमिरा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांच्या विभागाकडून ३१ डिसेंबर बंदोबस्त दरम्यान काशीमिरा वाहतूक पोलीसांकडून दारु पिवून गाडी चालवणार्‍यांवर कारवाई करत ३१ डिसेंबर या एकाच दिवशी ४६ जणांवर कारवाई करण्यात आली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -