Eco friendly bappa Competition
घर पालघर वीज व उपलब्ध होणार्‍या पाण्याचे लेखापरीक्षण होणार

वीज व उपलब्ध होणार्‍या पाण्याचे लेखापरीक्षण होणार

Subscribe

महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये वापरली जाणारी उपकरणे नादुरुस्त असणे किंवा इतर कारणांमुळे वीज देयक अधिक येऊ शकते.

भाईंदर :- मीरा-भाईंदर महापालिका मुख्य कार्यालय , प्रभाग कार्यालये, मनपा शाळा येथे वापरल्या जाणार्‍या विजेचे व शहरात केला जाणारा पाणीपुरवठा यांचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. या लेखापरिक्षणामुळे विजेच्या खर्चात व पाण्याच्या बिलात बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. मीरा- भाईंदर शहरात महापालिकेच्या अनेक मालमत्ता आहेत. त्यामध्ये मुख्य कार्यालय, प्रभाग कार्यालये, आरोग्य केंद्र, महापालिका शाळा, अग्निशमन केंद्र, ग्रंथालये अशा मालमत्ता आहेत. तसेच रस्त्यावर लावण्यात आलेले विजेचे खांब येथे विजेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नवाढ व खर्चात बचत करणे आवश्यक आहे. महापालिका कार्यालयातील विजेच्या वापरावर कोट्यवधी रुपये खर्च करावा लागत आहे. त्यादृष्टीने सर्वप्रथम विजेवर होणार्‍या खर्चात बचत करण्यासाठी लेखापरिक्षण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये वापरली जाणारी उपकरणे नादुरुस्त असणे किंवा इतर कारणांमुळे वीज देयक अधिक येऊ शकते.

तसेच रस्त्यावर लावलेल्या विजेच्या खांबामधून वीज चोरी होत असल्याचा देखील संशय आहे . अनेक वेळा विजेच्या खांबावरील वीज बंद असते तरीही बिल कमी होत नाही. त्यावर उपाययोजना करून खर्चात बचत करता येईल. तसेच महापालिकेला स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा या दोन्ही प्राधिकरणाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा व प्रत्यक्षात महापालिकेला मिळणारे पाणी यामध्ये तफावत आहे. पाणी गळतीमुळे यामध्ये तूट येते की आणखी काही कारणामुळे महापालिकेचा खर्च वाढतो. यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी वीज व पाणी वापराचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत संबंधित विभागाला दिले आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -