घर पालघर ...तर हळवी शेती करपून जाणार,रोगाचा प्रादुर्भाव होणार

…तर हळवी शेती करपून जाणार,रोगाचा प्रादुर्भाव होणार

Subscribe

अजून आठवडाभर पावसाने अशीच दांडी मारली तर पिके करपून जाणार असून रोगाचाही प्रादुर्भाव वाढणार असून पिकांची वाढ खुंटणार आहे.

मोखाडा: मोखाडा तालुक्यात एकाद दुसरी सर वगळता पावसाने कमालीची उघडीप दिली आहे.अजून आठवडाभर पावसाने अशीच दांडी मारली तर हळवी शेती करपून जाणार असून रोगाचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने एकूणच बळीराजा चिंताग्रस्त झालेला आहे. मोखाडा तालुक्याचे एकूण भौगोलिकक्षेत्र 48962.65 हेक्टर आहे. त्यापैकी लागवडीसाठी योग्य 28932 हेक्टर,पडित क्षेत्र 7305 हेक्टर , वन क्षेत्र 12876 हेक्टर पोटखराब 11030 हेक्टर,फळबागक्षेत्र 909.80 हेक्टर असून भात लागवडीखाली 2015 हेक्टर, नागली खाली 4322 हेक्टर, वरई खाली 3885 हेक्टर तर तृणधान्य तूर 526 हेक्टर, उडीद 1051 हेक्टर, मूग 38 हेक्टर आणि खुरासणी 310 हेक्टर क्षेत्र पिका खाली आहे. तालुक्यातील एकूणच शेती ही हंगामी असून पावसाळ्याचे 4 महिने शेती हंगाम असतो.त्यातच वरच्या पावसाने दगा दिला तर मान्सूनपूर्व मशागतीसह प्रत्यक्ष पिक काढणीपर्यंत शेतकर्‍यांनी केलेली प्रचंड मेहनत वाया जात असल्याने आता पावसाने कमालीची उघडीप दिल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.अजून आठवडाभर पावसाने अशीच दांडी मारली तर पिके करपून जाणार असून रोगाचाही प्रादुर्भाव वाढणार असून पिकांची वाढ खुंटणार आहे.

 

- Advertisement -

पावसाने अशीच उघडीप कायम ठेवली तर हळवी पिके हातातून जाणार आहेत.त्यामुळे पावसाची वाट आम्ही चातका सारखी पहात आहोत.

उमाकांत गणपत हमरे
प्रगतशील शेतकरी,खोडाळा

- Advertisement -

अजून 8/10 दिवस पाऊस लांबला तर हळव्या पिकांचे मोठे नुकसान होणार असून पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होवून पिके करपून जातील व पुरेशा पावसाअभावी पिकांची वाढ खुंटणार आहे.

आकाश सोळंखे
मंडळ कृषी अधिकारी,खोडाळा

अजून 5/6 दिवस हवामान कोरडे राहणार असून एखादी हलकी सर वगळता दमदार पावसाची शक्यता नाही.तसेच तापमान वाढल्यामुळे पाण्याची पातळी कमी होणार असून ज्या शेतकर्‍यांना आपल्या पिकांना पाणी देणे सोयीचे असेल तशी तजवीज त्यांनी करावी.

-रिझवाना सय्यद
कृषी हवामान तज्ञ, कोसबाड

- Advertisment -