घरपालघरघोळक्याने येतात,राडा करतात,मागे लागतात

घोळक्याने येतात,राडा करतात,मागे लागतात

Subscribe

रस्त्यावर दुचाकी स्वारांच्या मागे धावणारे श्वान हे तर काही ठराविक रस्त्यावर नेहमीचेच चित्र झाले आहे, त्यामुळे शहरात कुत्र्यांचे निर्बिजीकरण मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

जव्हार: जव्हार नगर परिषद हद्दीत मोकाट कुत्र्यांचा अक्षरक्ष: सुळसुळाट झाला आहे. विशेष करून हे कुत्रे घोळक्याने फिरत असून अबाल वृध्द व लहान मुलांवर धावून जात आहेत. शिवाय, पहाटे मॉर्निंग वॉकला जाणार्‍या महिला, जेष्ठ नागरिकांवर कुत्रे धावून जातात, मागे लागतात. त्यामुळे त्यांनाही घराबाहेर पडतांना या कुत्र्यांची दहशत जाणवते.
शहरात भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस विलक्षण भर पडत असून या भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अबाल वृद्ध आणि लहान मुलांना तर एकटे घराबाहेर पाठवणे धोकादायक वाटू लागले आहे. रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या जोरजोरात भुंकण्याने ज्येष्ठ नागरिकांची झोप उडून त्यांना निद्रानाशाचा विकार जडत आहे. रस्त्यावर दुचाकी स्वारांच्या मागे धावणारे श्वान हे तर काही ठराविक रस्त्यावर नेहमीचेच चित्र झाले आहे, त्यामुळे शहरात कुत्र्यांचे निर्बिजीकरण मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा अनेक बेकायदा मटण ,मच्छी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. यातील बरेच जण मच्छीचे पाणी, मांसल खराब तुकडे त्याच परिसरात फेकून देतात. ते खाण्यासाठी कुत्रे मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत. हे खाण्यासाठी या कुत्र्यांमध्ये हिंस्र संघर्ष होतो. त्यामुळे त्या रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांच्या मनात भीती निर्माण होते. तसेच काही जण घरातील उरलेले अन्न रस्त्याच्याकडेला टाकून देतात. ते खाण्यासाठी कुत्रे जमा होतात.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपूर्वी जव्हार नगर परिषदेने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपक्रम राबविला होता. श्वान पथक गाडी घेऊन शहरातील सर्व प्रभागात फिरून मोकाट कुत्र्यांना पकडून गाडीत कोंबून निर्बीजीकरण केले होते. या मोहिमेमुळे शहरातील कुत्र्यांचा उपद्रव काहीसा कमी झाला होता. त्यामुळे पुन्हा ही मोहीम राबवावी.
सोमनाथ बोराडे, सामाजिक कार्यकर्ते,जव्हार
&……………………………………………………………………………………….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -