Eco friendly bappa Competition
घर पालघर चोरट्यांनी केला कहर,वीज गेली,पाणी गेले

चोरट्यांनी केला कहर,वीज गेली,पाणी गेले

Subscribe

या गावची २५० लोकसंख्या आहे. येथील विद्युत जनित्राची चोरी झाल्याने गावावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. गावची नळपाणी पुरवठा योजना बंद झाली आहे.

वाडा : हल्लीचे चोर पैशांसाठी कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही.कारण ज्या जनित्राला धोका समजून नागरिक घाबरत असतात,तेच विजेचे जनित्र चोरट्यांनी चोरून नेले आहे. वाडा तालुक्यातील खरीवली( सिंधीचा पाडा ) या गावातील विद्युत जनित्र रविवारी रात्री चोरण्यात आले. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी जनित्र चोरून नेल्याने या गावातील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. खरीवली( सिंधी चा पाडा) या गावची २५० लोकसंख्या आहे. येथील विद्युत जनित्राची चोरी झाल्याने गावावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. गावची नळपाणी पुरवठा योजना बंद झाली आहे.

त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. घरात वीज नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही.त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. तर गावात मच्छरांची संख्या वाढल्याने आभाळ वृद्धांना विसावा घेता येत नाही. याची प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर नवीन विद्युत जनित्र बसून या गावातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी काँग्रेसचे नेते कैलास पाटील यांनी वीज वितरण प्रशासनाकडे केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -