घरपालघरधीरेंद्र शास्त्री बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चोरट्यांचे दिव्यदर्शन

धीरेंद्र शास्त्री बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चोरट्यांचे दिव्यदर्शन

Subscribe

याप्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात महिलांनी रांगेमध्ये थांबून तक्रार नोंदवण्यासाठी जत्रे सारखी गर्दी झाली होती. शेवटी सर्व महिलांच्या तक्रारीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर :- धीरेंद्र शास्त्री बाबा बागेश्वर धाम यांचा मिरारोड येथील एस.के. स्टोन मैदानात शनिवारी आणि रविवारी दिव्यदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांवर दिव्यदर्शन कृपा करीत हातसफाई केली आहे. भक्तांना मात्र प्रत्यक्षात त्याची चिट्टी निघून दिव्यदर्शन झाले नसले तरीही चोरट्यांना मात्र बाबा पावले आहेत, यामुळे चोरट्यांनी चांदी झाली आहे,अशी चर्चा आहे. याप्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात महिलांनी रांगेमध्ये थांबून तक्रार नोंदवण्यासाठी जत्रे सारखी गर्दी झाली होती. शेवटी सर्व महिलांच्या तक्रारीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धीरेंद्र शास्त्री बालाजी बागेश्वर धाम यांचा कार्यक्रम मीरा- भाईंदर येथे १८ व १९ रोजी आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मीरा -भाईंदर शहराच्या आमदार गीता जैन, भाजप जिल्हाध्यक्ष रवी व्यास, माजी जिल्हाप्रमुख हेमंत म्हात्रे, राजन नायर, माजी नगरसेवक सुरेश खंडेलवाल, प्रमोद पांडेय, श्याम गोस्वामी यांनी आयोजित केला आहे. त्यात बाबा शास्त्री हे महादिव्य दरबार व दिव्यदर्शन होते. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरांनी एकूण आपला दिव्य कारभार दाखवत त्यांनी एकाच दिवशी शनिवारी सायंकाळपर्यंत एकूण ३२ महिलांचे गळे साफ केले. बोरीवली वरून दिव्यदर्शन कार्यक्रमासाठी आलेल्या सुनीता गवळी यांनी सांगितले की, माझा दरबारात प्रश्न तर सुटलाच नाही, मात्र उलट मंगळसुत्राची चोरी झाली आहे. बोरिवली येथे राहणार्‍या गवळी यांचे जवळपास दीड लाखांचे मंगळसूत्र चोरी झाल्याने त्या या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत नाराज झाल्या होत्या. काही नागरिकांनी महिलांना चोरी करत असल्याच्या संशयावरून चार महिलांना पोलीस ठाण्यात जमा केल होते. त्या महिला राजस्थान राज्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -