घरपालघरयंदा जव्हार तालुक्यातील ऐतिहासिक बाळकापरा यात्रा होणार

यंदा जव्हार तालुक्यातील ऐतिहासिक बाळकापरा यात्रा होणार

Subscribe

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील बाळकापरा येथील जयेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी यात्रा भरते. परंतू कोरोनामुळे गेले काही वर्ष यात्रा रद्द झाली होती.

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील बाळकापरा येथील जयेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी यात्रा भरते. परंतू कोरोनामुळे गेले काही वर्ष यात्रा रद्द झाली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव संपताना दिसत आहे. राज्य शासनाने येत्या मार्चमध्ये सर्व निर्बंध काढण्याचे सूतोवाच केले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी आंगणेवाडीच्या भराडीदेवीची यात्रा अत्यंत जल्लोषात साजरी करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर जव्हार तालुक्यातील महाशिवरात्री निमित्ताने लोकप्रिय बाळकापराची यात्रा भरणार असल्याने व्यापारी, नागरिक भक्तांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जव्हार- डहाणू रस्त्यावर १० किमी अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र जयेश्वर शिवमंदिर हे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी येथे महाशिवरात्री निमित्त एकदिवसीय यात्रा भरते. ही यात्रा गेले कित्येक वर्षांपासून भरत आली आहे.

कोरोनामुळे यात्रा भरली नाही. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे यावर्षी यात्रा भरणार असून ही लोकप्रिय बाळकापराची यात्रा भरण्याची सर्वजण वाट पाहात आहेत.
– बळवंत गावित, अध्यक्ष, जयेश्वर शिवमंदिर, बाळकापरा

- Advertisement -

जव्हार संस्थान काळात डेंगाची मेट येथे मोहाची दारूचा कारखाना होता. तिथे मोठ्या प्रमाणावर गावठी दारू तयार करण्यात येत असते. त्या काळात वयोवृद्ध नागरिकांना संस्थान काळात मोहाच्या दारूचा परवाना दिलेला होता. हा दारूचा कारखाना पारशीचा होता. जव्हार संस्थान भारत सरकारमध्ये विलीन झाल्यानंतर तत्कालीन अबकारी खात्याने सर्व मोहाची दारू पेटवून दिली. दारूसाठा एक महिना जळत होता, असे सांगितले जाते. संस्थानकालीन खुणा आज पुसट झालेल्या दिसतात. आज ही तेथे एक मोठी स्वच्छ पाण्याची विहीर आहे. संस्थान काळात जव्हारचे राजघराणे त्या विहिराचा वापर करत असत. राजकन्या गरोदर असताना बाळकापरा येथे विशाल माळरानावर भातशेती असलेल्या भूभागावर करवंद खाण्यासाठी गेल्या असता तिथे त्यांना शंकराच्या पिंडीचे दर्शन झाले. तत्कालीन राजेसाहेबांनी लगेच त्याठिकाणी आज असलेले जुने मंदिर उभारले. नंतर बोरकर बाबा यांनी त्याठिकाणी कार्य केले. कसाऱ्याचे व्यापारी बागेसर प्रसाद यांच्या सौजन्याने १९६५ च्या काळात नवीन मंदिर उभारले. याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून यात्रा भरते.

हेही वाचा –

मनुकुमार श्रीवास्तव यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नेमणूक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -