पाण्यासाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

त्यावर साटम कोणतेही उत्तर देऊ न शकल्याने म्हात्रे यांनी दोन ते तीन दिवसात यावर तोडगा काढून समस्या सोडवली जाईल असे आश्वासन दिले.

wवसर्ई । वसई- विरार महापालिकेच्या वसई प्रभाग समितीच्या हद्दीत अनियमित आणि कमी पाणी पुरवठा केला जात असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने वसई प्रभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. वसई प्रभाग समिती हद्दीत सात एमएलडी पाणीपुरवठा मंजूर असताना सध्या फक्त चारच एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. दररोज तीन एमएलडी पाणी कमी मिळत असल्याने शहरात पाणी टंचाई जाणवत असते. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसने जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग समिती कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे आणि अभियंता प्रकाश साटम यांनी काँग्रेस शिष्टमंडळाशी चर्चा केली. यावेळी काँग्रेस नेत्यांनी पाणी चोरी प्रकरणी साटम यांना चांगलेच धारेवर धरले. त्यावर साटम कोणतेही उत्तर देऊ न शकल्याने म्हात्रे यांनी दोन ते तीन दिवसात यावर तोडगा काढून समस्या सोडवली जाईल असे आश्वासन दिले.

मागील वर्षी जाहीर केलेल्या बोरिंगबाबत जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा यांनी अहवाल मागितला. परंतु तो अहवाल पाणी पुरवठा अधिकारी उपलब्ध करू शकले नाहीत. आय प्रभागात काही भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा होतो. याबाबत कोणतीही माहिती महापालिकेच्या आय प्रभागात उपलब्ध नसल्याचे दिसले, अशी माहिती अल्मेडा यांनी दिली.
तसेच दुसर्‍या विषयात सोनोग्राफी मशीन नादुरुस्त असून येत्या आठवड्यात नवीन सोनोग्राफी मशीन उपलब्ध होईल. दोन डॉक्टर्स सोनोग्राफी मशीनसाठी उपलब्ध असतील असे डी.एम. पेटीट रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी बदानी यांनी यावेळी सांगितले. १५ मार्चपर्यंत आंदोलनकर्त्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशाराही अल्मेडा यांनी यावेळी दिला.