घरपालघरमहामार्गावर किरवली येथील भीषण अपघातात तिघे जखमी

महामार्गावर किरवली येथील भीषण अपघातात तिघे जखमी

Subscribe

या धडकेत युनिकॉर्न चालक हवेत फेकला गेला तर या गाडीची पेट्रोल टाकी व सीट आणि दुचाकी वेगवेगळे फेकले गेले आहेत.

वाडा :  वाडा- मनोर महामार्गवरील किरवली गावाच्या हद्दीत एका सुसाट कारने दोन दुचाकींना मागून धडक दिल्याने तिघेजण जखमी झाले असून, दोन्ही दुचाकी व कारचे मोठे नुकसान झाले आहे. किरवली येथील उतारावर युनिकॉर्न व स्प्लेंडर या गाड्यांना मनोरच्या दिशेकडून वाड्याकडे येत असणार्‍या मार्सिडीज या कारने मागून धडक दिल्याने युनिकॉर्न गाडी विरुद्ध दिशेला फेकली गेली तर स्प्लेंडर पुढे घसरत जाऊन पडली. या धडकेत युनिकॉर्न चालक हवेत फेकला गेला तर या गाडीची पेट्रोल टाकी व सीट आणि दुचाकी वेगवेगळे फेकले गेले आहेत. युनिकॉर्न चालक अक्षय महालेचा एक हात व एक पाय फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर स्प्लेंडर चालक किसन मढवी व त्याची आई नमिता मढवी यांच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मार्सिडीज चालकचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या दोन्ही गाड्यांना धडक देऊन विजेच्या खंबाला धडक दिल्याने विजेचा खांबही वाकला आहे. दरम्यान मार्सिडीज चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. अधिक तपास वाडा पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -