वाडा तालुक्यात महामार्गावरील दोन अपघातात तीन ठार

वाडा तालुक्यातील नेहरोली व कंचाडजवळ बुधवारी झालेल्या अपघातात तिघांना जीव गमवावा लागला आहे. भिवंडी वाडा मनोर महामार्गावर अपघातांची मालिका संपता संपेना.

वाडा तालुक्यातील नेहरोली व कंचाडजवळ बुधवारी झालेल्या अपघातात तिघांना जीव गमवावा लागला आहे. भिवंडी वाडा मनोर महामार्गावर अपघातांची मालिका संपता संपेना. या महामार्गावर रस्ता दुरुस्तीचे काम चालू असून हे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. दोन्ही ठिकाणी बरेकेट्स, सूचना फलक किंवा डायव्हर्शन अभाव आहे. तर इशारा देणारे कोणतेही फलक लावलेले नाहीत. भिवंडी वाडा मार्गावर नेहरोली येथे रस्ता दुरुस्तीचे काम चालू असून तिथे एकेरी वाहतूक असल्याने कुडूसहून येणारा ट्रक विरुद्ध मार्गाने येत असताना दुचाकीवरून जाणार्‍या इसमाला धडकल्याने झालेल्या अपघातात मनिष परदेशी (वय ३०) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचे दुःखद निधन झाले आहे. तर दुसार अपघात वाडा मनोर महामार्गावरील कंचाड हद्दीतील फनसपाडा येथे झाला आहे.

मनोरच्या दिशेकडून कंचाडकडे येत असलेल्या दुचाकीवरील दोघांचा अपघात झाला आहे. अपघाताच्या ठिकाणी रस्ता दुरुस्तीचे काम चालू असून याठिकाणी देखील सावधानतेचा फलक किंवा बरेकेट्स लावलेले असल्याने हे दोघच रस्त्यावर पडले. त्यांच्यावरून एखादा ट्रक गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात योगेश सुभाष गोवारी (वय २३) व किरण यशवंत बाने (वय २०) हे दोघेही ठार झाले आहेत. या अपघाताला जबाबदार असणार्‍या कंत्रातदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

हेही वाचा –

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला ड्रग्स प्रकरणातून दिलासा; एनसीबीने दिली क्लीनचिट