घरपालघरधीरेंद्र शास्त्री मुंबईत दाखल, काँग्रेस आणि अंनिसच्या विरोधानंतरही कार्यक्रम होणार?

धीरेंद्र शास्त्री मुंबईत दाखल, काँग्रेस आणि अंनिसच्या विरोधानंतरही कार्यक्रम होणार?

Subscribe

भाजपाने आयोजित केलेल्या धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला काँग्रेस आणि अंनिसकडून विरोध

भाईंदर – मीरारोड येथे धिरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार जिल्हा छतरपूर (मध्यप्रदेश) यांचा दिव्यदर्शन कार्यक्रम हा १८ व १९ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्याला काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे तर आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ने मागणी करत जादूटोणा विरोधी कायदा व ड्रग्स अँड मॅजिक रेमिडीज अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच शास्त्री यांना ताब्यात घेण्याची मागणी करून कार्यक्रमावर बंदी घालावी, अशी मागणी देखील केली आहे.

हा कार्यक्रम मिरारोड एस.के.स्टोन मैदानात १८ व १९ मार्च रोजी मीरा- भाईंदरच्या भाजपतर्फे आयोजित करण्यात आला असून चक्क मीरा- भाईंदर शहराच्या आमदार गीता जैन, भाजप जिल्हाध्यक्ष रवी व्यास, माजी जिल्हाप्रमुख हेमंत म्हात्रे, राजन नायर, माजी नगरसेवक सुरेश खंडेलवाल, प्रमोद पांडेय, श्याम गोस्वामी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
याबाबत अंनिसने मागणी केली आहे की, एखादी व्यक्ती जादुटोणा विरोधी कायदा २०१३ या कायद्यानुसार बंदी घातलेली कृती करीत असेल तर त्या कृतीला प्रतिबंधित करणे व त्यावर स्वतः तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई करावी. जादुटोणा विरोधी कायदा २०१३ मधील कलम ५ नुसार दक्षता अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. दक्षता अधिकार्‍यास या कायद्यानुसार कारवाई करणे बंधनकारक आहे.

- Advertisement -

या कायद्यानुसार कलम ३(३) नुसार अप्रत्यक्ष सहाय्य करणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तीला ६ महिने ते ७ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. हा कायदा दखलपात्र व अजामीनपात्र आहे,असे अंनिसचे म्हणणे आहे. शास्त्री यांच्या या व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्यानुसार जादूटोणा विरोधी कायदा २०१३ (महाराष्ट्र राज्य) नुसार आणि ड्रग्स अँड मजीक रेमीटीज ऍक्ट १९५४ नुसार गुन्हा आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी मीरारोड पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. अंनिसचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे, राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र खानविलकर, चंद्रकांत सर्वगोड, डॉ. प्रकाश ढोकने, प्रकाश सावंत यांनी लेखी पत्राद्वारे ही मागणी केली आहे.

तर, “धीरेंद्र शास्त्री यांचा १८ आणि १९ मार्च रोजी मुंबईत कार्यक्रम आहे. पण शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान करत संपूर्ण वारकरी संप्रदयाचाच अपमान केला आहे. यामुळे लाखो वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
शास्त्रीना कार्यक्रमास परवानगी देण हे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखे आहे, असा मजकूर असलेले पत्र नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -