घरपालघरनालासोपारा वाघोली येथील श्री शनि मंदिराचा उद्या वर्धापन दिन

नालासोपारा वाघोली येथील श्री शनि मंदिराचा उद्या वर्धापन दिन

Subscribe

प्रति शनी शिंगणापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नालासोपारा पूर्वेकडील वाघोली येथील शनी मंदिराचा १२ वा वर्धापन दिन येत्या शनिवार, २८ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे.

प्रति शनी शिंगणापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नालासोपारा पूर्वेकडील वाघोली येथील शनी मंदिराचा १२ वा वर्धापन दिन येत्या शनिवार, २८ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बिना दरवाज्याचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनी शिंगणापूरला जाणे जमत नसल्याने वसईकरांना फुलारे-नाईक परिवाराच्या शनि मंदिर सोयीचे ठिकाण ठरले आहे. मुंबईपासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर कोकणात किंवा गोव्याला गेल्याचा फील देणारा वसई-विरार पट्टा आहे. वाघोलीच्या हिरवाई आणि पाणथळ परिसरात सुमारे बारा एकराच्या विस्तीर्ण जागेत शनी मंदिर आहे.

आकाशाच्या निळ्या छत्राखाली एका उघड्या रिंगणाच्या मधोमध शिंगणापूरसारखी स्वयंभू शनीच्या शिळेची प्रतिकृती आहे. भाविक तिथे स्वहस्ते तेलाचा अभिषेक करू शकतात .तेलविक्री बचत गटाच्या महिलांमार्फत केलेली आहे. अभिषेकासाठी वापरले गेलेले हे तेल वाया न घालवता व्यवस्थित रिसायकल करून त्यात औषधी वनस्पतींचे अर्क मिसळून वृद्धांना व रुग्णांना मालिशसाठी विनामुल्य प्रसाद रूपाने वाटले जाते. शनिदेवाची प्रतिमा असलेले मंदिर प्रशस्त आणि आकर्षक आहे. लाकडापासूनचे उत्तम कौलारू काम यांची फार सुरेख रचना बांधकामासाठी केलेली आहे.

- Advertisement -

तसेच पुरणपोळी, आळूवडी, भरलेले मोदक, खरवस, दुधाचे लाडू, शेवई, थालीपीठ, पिठले भाकर असे नानाविध प्रकारांसोबत सामवेदी पांगीची मेजवानी सामवेदी खाद्यमेळाव्यात असणार आहे. महिला बचत गटातर्फे अस्सल मराठमोळे पदार्थ जसे की, झुणका-भाकरी, थालीपीठ, बटाटवडे उपलब्ध आहेत. लज्जतदार सुक्या चटण्यांपासून ते खमंग खोबर्‍याच्या वड्यांपर्यंत इथे बरेच काही विक्रीला उपलब्ध आहे. सामाजिक समारंभांसाठी एक प्रशस्त सभागृह देखील बांधलेले आहे. आयुष्यभर कष्ट करून थकलेल्या वृद्धांच्या दुखर्‍या पायांना घडीभर आराम देणारी, पाय दाबून देणारी यंत्रे विनामूल्य उपलब्ध केलेली आहेत.

हेही वाचा –

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला ड्रग्स प्रकरणातून दिलासा; एनसीबीने दिली क्लीनचिट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -