भाईंदर : भाईंदर पूर्वच्या रामदेव पार्क परिसरात असणार्या टोरेस कार्यालयात गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास नवघर पोलिसांनी टोरेस कार्यालयाचा पंचनामा केला. त्यावेळी मीरा- भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. गुंतवणूकदारांनी समोर येऊन तक्रार करावी असे आवाहन पोलीस उपायुक्त गायकवाड यांनी केले आहे. आतापर्यंत एकूण ७६ जणांची १ कोटी ७७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे आतापर्यंत निष्पन्न झाले आहे. नवघर पोलीस ठाण्यात टोरेस कंपनीविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर दोन बँक खाती सिझ करण्यात आली असून त्यातील जवळपास ९ कोटी रुपये गोठवले असल्याचे पोलीस उपआयुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले आहे. लोकांना फसवणुकीबाबत माहिती मिळत आहे, त्यानंतर लोक पोलीस ठाण्यात धाव घेत आहेत. त्यामुळे फसवणूकीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. कोणत्याही प्रकारच्या खोट्या स्कीम व जाहिरातींवर विश्वास ठेवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये, असे देखील पोलिसांमार्फत सांगण्यात आले आहे. सदरील पंचनाम्यावेळी नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी आणि नवघर पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्व्हेशन विभागाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.
Torres Scam: पोलिसांकडून भाईंदरमधील टोरेस कार्यालयाचा पंचनामा
written By My Mahanagar Team
Bhayandar
सदरील पंचनाम्यावेळी नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी आणि नवघर पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्व्हेशन विभागाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -