घरपालघरजव्हार अर्बन को. ऑप. बँक निवडणुकीत एकूण 50 टक्के मतदान

जव्हार अर्बन को. ऑप. बँक निवडणुकीत एकूण 50 टक्के मतदान

Subscribe

त्यात जनसेवा व शिवनेरी पॅनल समोर समोर रिंगणात होते. यात कुठले पॅनल बाजी मारणार ,याची खात्री कुठल्या पॅनलच्या कार्यकर्त्यांना देता येत नाही.

जव्हार : दी जव्हार अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. या बँकेच्या निवडणुकीत 50 टक्के मतदान झाले आहे. जव्हार संस्थानचे प्रसिद्ध राजे यशवंतराव मुकणे महाराज यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या जव्हारमधील अग्रगण्य समजल्या जाणार्‍या बँकेचे जव्हार, मोखाडा, खोडाळा, विक्रमगड, मनोर, वाडा, कुडूस या तालुक्यांतील एकूण १२,२१२ सभासद आहेत. त्यापैकी ६१४७ म्हणजे ५०.०० टक्के सर्वत्र मतदान झाले. यामध्ये १७ संचालकपदांसाठी एकूण ३४ उमेदवार रिंगणात होते. त्यात जनसेवा व शिवनेरी पॅनल समोर समोर रिंगणात होते. यात कुठले पॅनल बाजी मारणार ,याची खात्री कुठल्या पॅनलच्या कार्यकर्त्यांना देता येत नाही. या निवडणुकीत सर्वसाधारण १२ जागांसाठी २४ उमेदवार, तर राखीवमध्ये एससी, एसटीच्या एका जागेसाठी २ उमेदवार, ओबीसीच्या एका जागेसाठी २ उमेदवार, एनटीच्या एका जागेसाठी २ उमेदवार तर महिलांसाठी राखीव असणार्‍या दोन जागांसाठी ४ उमेदवार असे एकूण ३४ उमेदवार रिंगणात उतरले होते. याकरिता जव्हार येथे ८ बूथ, मनोर २ बूथ, खोडाळा १, विक्रमगड ३, मनोर ३, वाडा १, कुडूस १ असे एकूण १९ बूथचे नियोजन सहकार विभागाने केले होते. याकरिता ९५ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

- Advertisement -

नियोजनाचे तीनतेरा
यंदा मात्र सहकार विभागाने ज्येष्ठ नागरिकांना बैठकीची कुठलीच व्यवस्था केली नव्हती. तसेच अपंगासाठी व्हील चेअर उपलब्ध नव्हती. उमेदवारांनी केंद्राच्या बाहेर एकच गर्दी केली होती. त्यामुळे आयोजनात त्रुटी आढळुन आल्या. पोलिसांनी मात्र चोख बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -