घरपालघरतांदुळवाडी किल्ल्यावरील घनदाट जंगलात पर्यटक भरकटले

तांदुळवाडी किल्ल्यावरील घनदाट जंगलात पर्यटक भरकटले

Subscribe

तर पर्यटनासाठी प्रसिद्ध असणार्‍या तांदुळवाडी किल्ल्यावर दरवर्षी किमान पाच ते सहा वेळा पर्यटक अशा प्रकारे भरकटून अडकून पडत असल्याने स्थानिक प्रशासनाने योग्य उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

सफाळे: मुंबईतील एका मित्रांचा ग्रूप सुट्टीनिमित्त ट्रेकिंगसाठी फिरत असताना सायंकाळी परतीचा मार्ग न सापडल्याने घनदाट जंगलात भरकटून पडल्याचा प्रकार पालघर तालुक्यातील सफाळे पूर्वेकडील घनदाट व निसर्गरम्य अशा तांदुळवाडी किल्यावर गुरुवार २६ जानेवारी रोजी घडला. या घटनेची माहिती मिळताच सफाळे पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ट्रेकिंगसाठी आलेल्या पर्यटकांनी सुखरूप सुटका केली. तर पर्यटनासाठी प्रसिद्ध असणार्‍या तांदुळवाडी किल्ल्यावर दरवर्षी किमान पाच ते सहा वेळा पर्यटक अशा प्रकारे भरकटून अडकून पडत असल्याने स्थानिक प्रशासनाने योग्य उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

गुरुवार 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टीचा दिवस असल्या कारणामुळे मुंबई येथील पाच पुरुष व तीन महिला असे एकूण आठ डॉक्टरांचा एक ग्रूप सकाळी सफाळे येथील तांदुळवाडी किल्ल्यावर ट्रेकिंग करण्यासाठी आले होते. दिवसभर मनसोप्त किल्यावर फिरून परतत असताना घनदाट जंगलात ते पर्यटक वाट विसरून जंगलात अडकून पडले. जंगलात आपण अडकून पडल्याने लक्षात येताच एकमेकांना धीर देत त्यांनी पालघर जिल्ह्याच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षेला तत्काळ संपर्क साधून मदतीची मागणी केली.

- Advertisement -

त्यानुसार सफाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांना संदेश देण्यात आला. त्यांनी या बाबीचे गांभीर्य लक्षात घेतले. किल्ल्यावर असलेल्या हिंस्र प्राण्यांपासून पर्यटकांच्या जीवास धोका उद्भवू नये म्हणून त्वरित पोलीस हवालदार ए.व्ही. खोत, पोलीस कॉन्स्टेबल शेळके, पोलीस हवालदार मोकळ,व तांदुळवाडी गावचे माजी सरपंच रमेश चावरे, व ग्रामस्थ बाळाराम सुमडा यांच्यासह या घनदाट जंगलात जाऊन या आठ पर्यटकांचा शोध घेऊन सर्व व्यक्तींना सुखरूपपणे बाहेर काढले. यापैकी तीन व्यक्ती डॉक्टर तर अन्य पाच त्यांच्या मित्र परिवारातील आहेत. या सर्वांना गुरुवारी संध्याकाळी सुखरूपपणे किल्ल्यावरून बाहेर काढल्यानंतर त्यांची योग्य चौकशी करून सफाळे पोलिसांनी त्यांना मुंबईला पाठवून दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -