Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर पालघर उपायुक्त म्हसाळ यांना कामगार संघटनेचा विरोध

उपायुक्त म्हसाळ यांना कामगार संघटनेचा विरोध

नियमबाह्य काम करणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तत्कालीन उपायुक्त विजयकुमार म्हसाळ वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. त्यावेळी त्यांची चौकशीही झाली होती. म्हसाळ यांना पुन्हा एकदा राज्य सरकारने प्रतिनियुक्तीवर पाठवले आहे.

Related Story

- Advertisement -

नियमबाह्य काम करणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तत्कालीन उपायुक्त विजयकुमार म्हसाळ वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. त्यावेळी त्यांची चौकशीही झाली होती. म्हसाळ यांना पुन्हा एकदा राज्य सरकारने प्रतिनियुक्तीवर पाठवले आहे. मात्र, अशा वादग्रस्त अधिकार्‍याला सेवेत रुजू करून घेऊ नये, अशी मागणी मीरा भाईंदर कामगार सेनेने आयुक्तांकडे केली आहे. म्हसाळ २०१५ ते २०१८ या दरम्यान महापालिकेत उपायुक्त म्हणून प्रतिनियुक्तीवर आले होते. त्यांच्याविरोधात नियमबाह्य कामे, भ्रष्टाचार यासह असंख्य तक्रारी केल्या गेल्या. त्यावेळी आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन अतिरिक्त आयुक्त माधव कुसेकर यांनी चौकशी करून अहवाल १८ जानेवारी २०१९ आयुक्तांना सादर केला होता. पण, अहवालात नेमके काय आहे, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे, कामगार सेनेचे म्हणणे आहे.

भ्रष्टाचाराची पाठराखण करण्यात म्हसाळ अग्रेसर होते. नियमबाह्य कामे करून आर्थिक व्यवहार केल्याचे सुद्धा आरोप आहेत. त्यांनी कर्मचार्‍यांचे व महापालिकेचे हित लक्षात घेऊन कामे केलेली नाहीत. ज्यात फायदा असेल अशाच गोष्टींना त्यांच्या कार्यकाळात जास्त गाजला आहे. महापालिकेतील अनेकांना बेकायदा नियमबाह्य पदोन्नती देण्याचा ठपका ही त्यांच्यावर आहे. त्यांच्याच काळात महापालिकेच्या मालकीचे वाहन चोरीला गेले होते. त्याची सुद्धा त्यांनी पोलिसात तक्रार केली नव्हती. असे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत, अशी तक्रार कामगार सेनेचे शाम म्हाप्रळकर यांनी केली आहे.
दरम्यान, महापालिकेत उपायुक्तांची चार पदे मंजूर आहेत. मंजूर सेवा शर्तीनुसार ५०-५० टक्क्यानुसार पदे भरायची आहेत.

- Advertisement -

त्यातील दोन पदे प्रतिनियुक्तीने भरली गेली आहेत. उर्वरीत दोन पदे महापालिकेतीलच अधिकार्‍यांना पदोन्नती देऊन भरावयची आहेत. त्यातील एका पदावर डॉ. संभाजी पानपट्टे यांना नेमण्यात आले आहे. उरलेल्या एका उपायुक्त पदावर महापालिकेच्या सेवेतीलच अधिकार्‍याची नियुक्ती करावी, अशीही कामगार सेनेची मागणी आहे. मंजूर सेवा शर्तीनुसार म्हसाळ यांची नियुक्ती अतिरिक्त होणार आहे. त्यामुळे वादग्रस्त म्हसाळ यांना कामावर हजर करून घेऊ नये, अशी मागणी आहे.

हेही वाचा –

बांगलादेशात कारोनाची दुसरी लाट; ७ दिवसांचा देशव्यापी लॉकडॉऊन

- Advertisement -