Eco friendly bappa Competition
घर पालघर एकेरी वाहतुकीमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी

एकेरी वाहतुकीमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी

Subscribe

पाहणी अहवालानुसार नादुरुस्त पुलाच्या स्लॅबचा काही भाग तोडून पुलाच्या आतील गंजलेल्या सळ्या काढून टाकून आधुनिक हाय स्पीड सिमेंट काँक्रिटचा वापर करून पुलाच्या दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याचे जाहीर केले होते.

मनोर: आठवडाभरापूर्वी मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील चिंचपाडा उड्डाणपुलाच्या गुजरात मार्गिकेवरील पुलाच्या स्लॅबचा खालचा भाग पडला होता.स्लॅब कोसळल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ दखल घेत वाहतूक पोलिसांची नेमणूक करीत पुलावरून एकेरी वाहतूक सुरू ठेवली केली होती.पुलावरून सुरू असलेल्या एकेरी वाहतुकीमुळे पुलाच्या परिसरात आठवडाभरापासून मोठी वाहतूक कोंडी होत आहे.वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करीत दुरुस्तीची मागणी केली होती. महामार्ग प्राधिकरणाने नेमलेल्या तज्ज्ञांकडून नादुरुस्त पुलाची पाहणी करण्यात आली होती.पाहणी अहवालानुसार नादुरुस्त पुलाच्या स्लॅबचा काही भाग तोडून पुलाच्या आतील गंजलेल्या सळ्या काढून टाकून आधुनिक हाय स्पीड सिमेंट काँक्रिटचा वापर करून पुलाच्या दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याचे जाहीर केले होते.

महामार्ग प्राधिकरण अधिकार्‍यांनी तज्ञ पाहणी समितीच्या अहवालनुसार ठेकेदाराला दुरूस्तीचे काम देण्यात आले आहे.दोन दिवसांपूर्वी चिंचपाडा पुलावर खोदकामाला सुरुवात करण्यात आली आहे. खोदकामानंतर पुलाच्या आतील भागात गंजलेल्या लोखंडी सळ्या काढल्या जाणार आहेत. त्यानंतर आधुनिक हाय स्पीड सिमेंट काँक्रिटचा वापर करून पुलाची दुरुस्ती केली जाणार आहे.दुरुस्तीनंतर आठवडाभरात पुलावरून वाहतूक सुरू केली जाणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपासून चिंचपाडा नादुरुस्त पुलाचा भाग तोडण्याचे काम ठेकेदार कंपनीच्या तज्ञ कामगारांमार्फत सुरू आहे.आठवडाभरात दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पुलावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू केली जाईल.

– सुमित कुमार,व्यवस्थापक,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -