घरपालघरट्रान्सफॉर्मर आणि वॉल्व्हमुळे रहदारीत अडथळा

ट्रान्सफॉर्मर आणि वॉल्व्हमुळे रहदारीत अडथळा

Subscribe

तसेच जलवाहिनीच्या वॉल्व्हवर चेंबर बसवून वॉल्व्ह भूमिगत करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

वसई : महावितरणचा ट्रान्सफॉर्मर आणि वसई- विरार महापालिकेचा जलवाहिनीचा वॉल्व्ह वाहतुकीत अडथळा ठरत असल्याने हा ट्रान्सफॉर्मर अन्य जागेत स्थलांतरित करावा. तसेच जलवाहिनीच्या वॉल्व्हवर चेंबर बसवून वॉल्व्ह भूमिगत करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. नालासोपारा स्थानक ते तुळींज रोड हा आत्यंतिक रहदारीचा मार्ग आहे. सकाळी व सायंकाळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. शेकडो वाहने आणि पादचारी या रस्त्यावरून शहरात आणि शहराबाहेर मार्गक्रमण करत असतात. मात्र या रस्त्याखालून गेलेल्या वसई-विरार महापालिकेच्या जलवाहिनीचे वॉल्व्ह या रहदारीत अडथळा ठरत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. तर महावितरणचा ट्रान्सफॉर्मरही येथील रहदारीत अडचण ठरत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.या रस्त्यावरील तुळींज नाका पोस्ट ऑफिसशेजारी असलेला ट्रान्सफार्मर व जलवाहिनीच्या वॉल्व्हला एखादा पादचारी किंवा वाहन धडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने हा ट्रान्सफॉर्मर अन्य ठिकाणी हलवावा. महापालिकेने जलवाहिनीच्या वॉल्व्हवर चेंबर बसवून हा वॉल्व्ह भूमिगत केल्यास या मार्गावरील रहदारी सुरळीत होण्यास मदत होऊ शकेल, अशी अशा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी याठिकाणची पाहणी करून वसई महावितरणचे अधीक्षक अभियंता व महापालिका आयुक्तांना पत्र लिहून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -