घरपालघरमहापालिकेच्या ५१ ठेका अभियंत्यांच्या बदल्या; आयुक्तांची धडक कारवाई

महापालिकेच्या ५१ ठेका अभियंत्यांच्या बदल्या; आयुक्तांची धडक कारवाई

Subscribe

वसई विरार महापालिकेतील ठेका पद्धतीवरील कनिष्ठ अभियंत्यांची मुजोरी मोडीत काढण्यासाठी महापालिका आयुक्तांनी ५१ ठेका अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या करून सर्वांना धक्का दिला.

वसई विरार महापालिकेतील ठेका पद्धतीवरील कनिष्ठ अभियंत्यांची मुजोरी मोडीत काढण्यासाठी महापालिका आयुक्तांनी ५१ ठेका अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या करून सर्वांना धक्का दिला. कनिष्ठ ठेका अभियंते महानगरपालिकेवर वरचढ होत असून त्यांचे अनेक प्रताप दैनिक आपलं महानगरमध्ये मंगळवारच्या वेध परिसराच्या सदरात प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यांच्यावर आयुक्त कारवाई करतील की नाही असा प्रश्न उपस्थित होत असतानाच महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी ठेका पद्धतीवरील जवळपास सर्वच कनिष्ठ अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी ५१ कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

बहुतेक कनिष्ठ अभियंत्यांना अतिक्रमण विभागातच काम करण्यात अधिक रस असल्याचे दिसून येते. अतिक्रमणमधील मलिदेसह मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिका-यांच्या वरदहस्त लाभत असल्याने ठेका पद्धतीवरील अनेक कनिष्ठ अभियंते गब्बर झालेले आहेत. काहीजण तर कित्येक वर्षांपासून एकाच प्रभागात ठाण मांडून बसले आहेत. युवराज पाटील आणि स्वरुप खानोलकर यांच्यासारखे अनेक अभियंते वरचढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्याच आठवड्यात वरपर्यंत पोहोच असलेल्या युवराज पाटील आणि स्वरुप खानोलकर यांना आयुक्तांनी सरळ घरचा रस्ता दाखवला होता.

- Advertisement -

अतिक्रमण विभागात असलेल्या स्वप्नील संखे, कौस्तुभ तामोरे, तुषार माळी, दिलीप बुक्कन, महेश शिरीषकर, भीम रेड्डी, साहिल सावे, सुनील इरकर, मिलिंद शिरसाट दुसऱ्या प्रभागात बदली करण्यात आली आहे. रेड्डी, सावे आणि शिरसाट यांना दुसऱ्या प्रभागातील अतिक्रमण विभागात पाठवण्यात आलेले आहे. उर्वरित अभियंत्यांना बांधकाम, डंम्पिंग ग्राऊंड व्यवस्थापन, एसटीपी, बांधकाम विभागात पाठवण्यात आले आहे. बांधकाम, पाणीपुरवठा, डंम्पिंग ग्राऊंड, उद्यान, घनकचरा व्यवस्थापन आदी विभागातील अभियंत्यांच्या प्रभाग अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा –

तब्बल १८४ चालकांचे परवाने तात्पुरते रद्द

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -