Eco friendly bappa Competition
घर पालघर महाराष्ट्राच्या हास्यजत्रेविरोधात आदिवासी समाज आक्रमक

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेविरोधात आदिवासी समाज आक्रमक

Subscribe

सोशल मीडियावर या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात असून हास्य जत्रा कार्यक्रमाचे कलाकार आणि चॅनलने आदिवासींची माफी मागावी, अशी मागणी आदिवासी समाजाकडून केली जात आहे.

डहाणू: हास्य जत्रा कार्यक्रमामध्ये आदिवासींच्या तारपा नृत्याची खिल्ली उडवल्याचा आरोप करीत आदिवासी समाजाकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. तसेच डहाणू तालुक्यातील आदिवासी बांधवांकडून मंगळवार 30 मे रोजी हास्य जत्रा कलाकारांचे पोस्टर जळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आदिवासी पारंपरिक नृत्य प्रकार असलेले “तारपा नृत्य” हे आदिवासींसाठी मानाचे प्रतीक आहे. हास्य जत्रा कार्यक्रमातील एका भागात आदिवासी तारपा नृत्याची खिल्ली उडवण्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत असून यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

सोशल मीडियावर या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात असून हास्य जत्रा कार्यक्रमाचे कलाकार आणि चॅनलने आदिवासींची माफी मागावी, अशी मागणी आदिवासी समाजाकडून केली जात आहे. निषेध नोंदविण्यासाठी आदिवासी नागरिक, यूट्यूब कलाकार आणि संघटनांच्या माध्यमातून चारोटी येथे एकत्र येत हास्य जत्रा कलाकार आणि चॅनलने आदिवासींची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी हास्य जत्रा कार्यक्रमाचा देखील निषेध नोंदवण्यात आला. यावेळी आदिवासी भूमी सेनेचे पदाधिकारी भरत वायडा, एकता परिषदचे सुनील पर्‍हाड, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी, लतिका बालशी, डहाणू पंचायत समिती माजी सभापती स्नेहलता सातवींसह यूट्यूब कलाकार आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -