घरपालघरवसईतील गिर्यारोहकांकडून चंद्रभागा शिखरावर तिरंगा

वसईतील गिर्यारोहकांकडून चंद्रभागा शिखरावर तिरंगा

Subscribe

वसईतील दोन गिर्यारोहकांनी हिमाचल प्रदेशातील स्प्रिती व्हॅलीतील चंद्रभागा १४ हा पीक सर केला आहे. इंडियन माउंटनींग  फाउंडेशनच्या माध्यमातून व एडवेंचर व्हॅलीने आयोजित केलेल्या या मोहिमेत देशभरातील विविध भागातून आलेल्या बारा गिर्यारोहकांचा सहभाग होता.

वसईतील दोन गिर्यारोहकांनी हिमाचल प्रदेशातील स्प्रिती व्हॅलीतील चंद्रभागा १४ हा पीक सर केला आहे. इंडियन माउंटनींग  फाउंडेशनच्या माध्यमातून व एडवेंचर व्हॅलीने आयोजित केलेल्या या मोहिमेत देशभरातील विविध भागातून आलेल्या बारा गिर्यारोहकांचा सहभाग होता. त्यात वसईतील मांडलई येथील हर्षाली वर्तक व विरार येथील नितीन गांधी या दोघांनी ही मोहीम २० तासात फत्ते केली आहे.

कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक या दोघांचाही त्यांच्या टीममध्ये सहभाग होता. मंगळवारी तीन ऑगस्ट रोजी रात्री वीस दिवसांनंतर हे गिर्यारोहक घरी परतले असून त्यांच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वसईतील मांडलई येथील हर्षाली वर्तक या गिर्यारोहक तरुणीने २०११ पासून देश-विदेशातील अनेक अवघड ट्रेकिंग मोहिमा सर केलेल्या आहेत. जुलै २०२१ मध्ये हिमाचल प्रदेशातील स्प्रीती व्हॅलीतील चंद्रभागा १४ ही मोहीम या गिर्यारोहकांनी हाती घेतली होती. ही मोहीम तशी अवघड असून गेल्या तीन वर्षात चंद्रभागा १४ च्या वाटेला कोणताही गिर्यारोहक त्याची बिकट वाट,अवघड चढण यामुळे फिरकला नव्हता.

- Advertisement -

इंडियन माउंटनींग फाउंडेशनच्या वतीने तसेच एडवेंचर व्हॅलीच्या माध्यमातून ही मोहीम आखण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातील पाच, गुजरातमधील पाच, इंदोरमधील एक व हरियाणातील एक अशा एकूण बारा गिर्यारोहकांचा समावेश होता. या मोहिमेसाठी १५ जुलै रोजी हे सर्व गिर्यारोहक सोलंग एडवेंचर व्हॅली येथे पोहोचले होते. त्यानंतर पातालसू येथे वातावरण मिळते जुळते करण्यास गेले. नंतर बाताल, बेस कॅम्प, कॅम्प -१ असा त्यांनी पायी प्रवास केला. प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर कॅम्प १ ते से.मि. पर्यंत चार हजार फुटावर प्रवास करून, खराब वातावरणामुळे अवघ्या तीनशे मीटर अंतरावर पोहोचूनही त्यांना आपली मोहीम अर्धवट सोडावी लागली होती. त्यामुळे तब्बल १७ तासांची मेहनत वाया गेली.

- Advertisement -

दरम्यान, वसईतील कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक हे हवामानाशी मिळते जुळते होऊ शकले नाही. त्याअभावी (acclimatization issue) त्यांना बेस कॅम्पवरच रहावे लागले होते. पुन्हा नव्या जोमाने टीम लीडर हर्षाली वर्तक यांच्या टीममधील चार तर दुसऱ्या टीममध्ये सहा जणांनी रात्री दहाच्या दरम्यान चंद्रभागा १४ मोहीम सर करायला सुरुवात केली.

बोचरी थंडी, गुढगाभर  बर्फ, रोफ फ्लिकसीग, सनबर्ग, स्नोफॉल यांच्या त्रासांना सामोरे जात बारा तासांची पायपीट करत ते सकाळी दहा वाजता चंद्रभागा १४ च्या टॉपवर पोहोचले. त्यानंतर अभिमानाने भारताचा झेंडा त्यांनी फडकवला. मात्र, यादरम्यान पुन्हा वातावरणाने दगा दिला. निसर्गातील होणारे बदल व अचानक बर्फ पडायला सुरुवात झाल्यामुळे त्यांना पुन्हा संध्याकाळी सहापर्यंत बेस कॅम्पवर पोहोचावे लागले. हर्षाली वर्तकसोबत तिच्या टीममध्ये विरारचा नितीन गांधी, औरंगाबादचा प्रवीण शेळके, इंदौरची अॅनी यांचा समावेश होता. वसईच्या कुलदीप चौधरी व शिवानी वर्तक यांना ही मोहीम अर्धवट सोडावी लागली. या गिर्यारोहकांना जवळपास एक लाख रुपये माणसी खर्च आला आहे. वसईत पोहोचल्यानंतर या सर्वांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

हर्षाली वर्तक पालघर जिल्ह्यातील पहिली महिला गिर्यारोहक असून २०११ पासून माउंट फ्रेंडशिप पिक, हनुमान टिब्बा, माउंट युनाम, मांऊट मेनथोसा, मांऊट डीकेडी म्हणजे द्रोपदीचा दांडा, माऊंट फ्युजी, माऊंट किल्लीमांजरो, माऊंट इल्बूस या देश-विदेशातील अनेक अवघड मोहिमा तिने सर केल्या आहेत. कांचनगंगा ही हिमालयातील अवघड मोहीम तिला सर करायची असून तिचे ते स्वप्न आहे.

हेही वाचा –

Corona Vaccination: लहान मुलांच्या लसीकरणासाठी पुढचं वर्ष उजाडणार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -