Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर पालघर ट्रक रस्त्याच्या मध्यभागी अडकल्याने वाहतूक कोंडी

ट्रक रस्त्याच्या मध्यभागी अडकल्याने वाहतूक कोंडी

Subscribe

त्यामुळे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

भाईंदर :- मीरारोड पूर्वच्या सिनेमॅक्स चित्रपट गृहाच्या बाहेर रस्ता खराब असल्याने सकाळी १० च्या सुमारास एक ट्रक रस्त्याच्या मधोमध अडकल्याची घटना घडली आहे. बर्‍याचवेळ प्रयत्न केल्यानंतर देखील अडकलेला ट्रक चालकाला बाहेर काढता न आल्याने अखेरकार क्रेन मागवून ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला आहे. मात्र रस्त्याच्या मध्यभागी ट्रक अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेरकार मीरा- भाईंदर महानगर पालिका आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना याबाबत तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. मीरा -भाईंदर शहरात सुरू असणार्‍या गटारे, रस्ता आणि मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. एवढेच नाही तर रस्त्यांच्या निकृष्ट बांधकामामुळे अपघातही घडत आहेत. लवकरात लवकर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.

चौकट :-

- Advertisement -

चारचाकी फसली –

भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीच्या बाहेरील रस्त्याच्या ठिकाणी काम चालू असताना त्यात कुठलीही सुरक्षा न-ठेवल्याने कामाच्या ठिकाणी चारचाकी कार फसली होती. शेवटी त्या गाडीला तिथल्या स्थानिक माणसांनी धक्का मारून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला .शेवटी शेवटी क्रेनच्या साहाय्याने चारचाकी काढावी लागली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -