घरपालघरशिरसाड- अंबाडी मार्गावरील चांदीप येथे एकाच दिवशी दोन अपघात

शिरसाड- अंबाडी मार्गावरील चांदीप येथे एकाच दिवशी दोन अपघात

Subscribe

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई- अहमदाबाद महामार्गापासून जाणार्‍या राज्य मार्गावरील शिरसाड अंबाडी दरम्यानच्या चांदीप परिसरात रविवारी एकाच दिवशी दोन अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

विरार :  वसई पूर्वेच्या भागातून मुंबई- अहमदाबाद महामार्गापासून जाणार्‍या राज्य मार्गावरील शिरसाड अंबाडी दरम्यानच्या चांदीप परिसरात रविवारी एकाच दिवशी दोन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पहिल्या घटनेत शिरसाड- अंबाडी मार्गावरील मांडवी व चांदीप या गावांच्या दरम्यान मालवाहतूक करणार्‍या भरधाव अनियंत्रित ट्रकचा अपघात घडला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक लागून हा ट्रक पलटी झाला असून ह्यात वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास अनियंत्रित वेगवान ट्रकची झाडाला धडक लागून ट्रक पलटी झाला आहे. हा ट्रक शिरसाड मार्गे अंबाडी दिशेने भरधाव जात असताना चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले व ट्रक सैरभैर होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन आदळला आणि ट्रक पलटी झाला. अपघाताची तीव्रता पाहता ट्रकचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
दुसर्‍या घटनेत शिरसाड अंबाडी दरम्यानच्या चांदीप परिसरात दुचाकी व ट्रक यांची धडक बसून अपघात घडला आहे. रविवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अंबाडी होऊन शिरसाड मार्गे ग्रेड पावडर वाहून नेणारा ट्रक व शिवणसई येथे जाणार्‍या दुचाकी यांची समोरासमोर धडक बसून अपघात घडला आहे. ह्यात ऋषी किणी (३५) शावेरी कीणी (१८) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -