फ्लॅट विक्री फसवणुकीप्रकरणी दोन बिल्डरांना अटक

भाईंदर पूर्वेला एका इमारतीत फ्लॅट देतो, असे सांगून शुक्ला यांची ८० लाखांची फसवणूक करणाऱ्या पाच बिल्डरपैकी दोन बिल्डर बाबुराज भास्कर पनिकर तर सय्यद इंतखाब हसन याला नवघर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

भाईंदर पूर्वेला एका इमारतीत फ्लॅट देतो, असे सांगून शुक्ला यांची ८० लाखांची फसवणूक करणाऱ्या पाच बिल्डरपैकी दोन बिल्डर बाबुराज भास्कर पनिकर याला गोव्यातून तर सय्यद इंतखाब हसन याला मीरारोड येथून तब्बल तीन वर्षानंतर नवघर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित तीन फसव्या बिल्डरांचा पोलीस शोध घेत असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांनी सांगितले आहे. भाईंदर येथे राहणारे चंद्रप्रकाश शुक्ला यांनी भाईंदर येथील चैतन्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे भागीदार बाबुराज भास्कर पनिकर, गौरव बाबुराज पनिकर, निहंत बाबुराज पनिकर यापैकी गौरव व निहंत यांनी मेसर्स एस. आय. कंट्रक्शन कंपनीचे मालक सय्यद इंतखाब हसन यांच्या सोबत ३० एप्रिल २००८ रोजी चैतन्य हाइट बिल्डिंगचे कंट्रक्शन आणि डेव्हलपमेंट साठी करारनामा केला. मार्च २०१४ मध्ये करारनाम्यामध्ये ६ फ्लॅट विकत घेण्याचे ठरले. त्या सहा फ्लॅटची किंमत १ कोटी ९० लाख ६८ हजार देण्याचे ठरले. त्यानुसार त्यांनी स्लॅबनुसार ८० लाख रुपये रक्कम बिल्डरांना दिली.

पनिकर भागीदारांनी आपली भागीदारीतील कंपनी बंद करून दुसरी कंपनी सुरू करत त्या इमारतीची जागा विकासक सय्यद इंतखाब हसन व विकासक महेंद्र कोठारी यांना विकली. त्या जागेवर सुरू असलेल्या इमारतीचे काम बंद झाले. तसेच शुक्ला यांना विकलेले फ्लॅट आणखी कोणाला विकत असल्याचे शुक्ला यांनी माहिती मिळाली. त्यानुसार हे आपली फसवणूक करत आहेत.

त्यानुसार शुक्ला यांनी २८ मार्च २०१९ रोजी नवघर पोलीस ठाण्यात ६ महिन्यात फ्लॅट देतो, असे सांगून ८० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चैतन्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे भागीदार बाबुराज त्यांची मुले निहंत, गौरव तसेच यांचा भागीदार सय्यद इंतखाब हसन व महेंद्र कोठारी यांच्याविरोधात संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी भादवि ४२०, ४०६, १२० ब, ३४ सह, मोफा कायदा १९६३ चे कलम ३, ४ व महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍथॉरिटी कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन तीन वर्षे झाली. परंतु अद्यापपर्यंत त्या विकासकांना अटक करण्यात आली नव्हती. दोन दिवसांपूर्वी त्या दोन विकासकांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा –

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सडीज बेबी, फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार