दुचाकीच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

कोचाळा मार्गावर हिरो होंडा मोटार सायकल क्रमांक MH04AG9680 व हिरो होंडा मोटार सायकल क्रमांक MH15DY0155 या दोनही मोटार सायकलींची समोरासमोर भिषण टक्कर झाली आहे.

मोखाडा:  मोखाडा तालुक्यातील कोचाळे मार्गावर काल सोमवार दि. २९ रोजी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान दोन मोटारसायकलींची समोरासमोर समोर भीषण धडक झाली आहे. यात खोडाळा येथील प्रतिष्ठित व्यापारी कैलास मुतडक व कोचाळा येथील अनिल शांताराम फसाळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सागर हनुमंत फसाळे याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर घोटी ( नाशिक ) येथे उपचार सुरू आहेत.

कोचाळा मार्गावर हिरो होंडा मोटार सायकल क्रमांक MH04AG9680 व हिरो होंडा मोटार सायकल क्रमांक MH15DY0155 या दोनही मोटार सायकलींची समोरासमोर भिषण टक्कर झाली आहे. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यातील कैलास प्रभाकर मुतडक हे कोचाळा येथील दुकानाचे काम आटोपून खोडाळा येथे येत होते. तर अनिल फसाळे कोचाळा फाट्यावरून आपल्या घरी कोचाळा येथे जात असताना कोचाळा फाटा ते कोचाळा गावाच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला आहे.यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला असून सागर फसाळे याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर घोटी नाशिक येथे उपचार सुरू आहेत. या घटनेने खोडाळा आणि कोचाळा गावावर शोककळा पसरली असून मुतडक याच्यावर खोडाळा येथे अग्नी संस्कार करण्यात आले आहेत.