घरपालघरअंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक, मुद्देमाल जप्त

अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक, मुद्देमाल जप्त

Subscribe

आरोपींच्या विरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे हे करत आहेत.

भाईंदर :- काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीत ४ किलो गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना काशिमिरा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिसरात अंमली पदार्थ विक्री करणारे तसेच बाळगणार्‍या व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्याविरूध्द कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, सहा. पोलीस आयुक्त, मीरारोड विभाग यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करत असताना मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील मन ओपस बिल्डिंगजवळील पडक्या घराजवळ काशिमिरा येथे पारस धिरूभाई चावडा (३० ), पुष्पक महेंद्रसिंग चौहान (२८ ) हे इसम संशयास्पदरित्या वावरत असताना दिसून आले. त्यांच्याकडे असलेल्या बॅगची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात ४ किलो वजनाचा ८० हजार रू. किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ व दोन मोबाईल असा एकूण १ लाख ५ हजार रू. किंमतीचा मुद्देमाल मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. आरोपींच्या विरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे हे करत आहेत.

आपल्या परिसरात कोणतीही व्यक्ती अमली पदार्थ विक्री किंवा सेवन करत असल्याचे आढळून आल्यास तात्काळ त्याची माहिती पोलिसांना द्यावी, त्यांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. त्यामुळे आपले परिसर, शहर ड्रग्स फ्री करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -