घरपालघरविटांचा ट्रक उलटून दोन मजूरांचा मृत्यू; तर ५ जण जखमी

विटांचा ट्रक उलटून दोन मजूरांचा मृत्यू; तर ५ जण जखमी

Subscribe

पालघर शहराजवळ पुर्वेला वाघोबा घाटात पालघर-मनोर रस्त्यावर विटांची वाहतूक करणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पालघर शहराजवळ पुर्वेला वाघोबा घाटात पालघर-मनोर रस्त्यावर विटांची वाहतूक करणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात ५ मजूर जखमी झाले आहेत. घाटावरून उतरताना ट्रॅकवरून ड्रायव्हरचा नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे. ट्रकवरून नियंत्रण सुटताच चालकाने चालत्या ट्रकमधून उडी घेतल्याने तो बचावला. याप्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पालघर पोलीस करत आहे.

पालघर पूर्वेच्या वावे गावातून विटा भरून पालघरकडे जाणारा ट्रक पालघरच्या वाघोबा घाटात उलटल्याने त्या ट्रक खाली दाबून दोन मजुरांच्या जागीच मुत्यू झाला आहे. अपघातात उमेश पवार आणि दामू सुतार यांचा मृत्यू झाला असून शंकर भूतकडे, साईनाथ गवळी, अक्षय मानकर, कुंदन भंडारी, मनोज रावते जखमी झाले आहेत. यातील २ मजूर किरकोळ जखमी असून पालघर ग्रामीण रुग्णालयात त्यांचे उपचार सुरु आहेत. तर ३ मजुरांना जबर मार लागल्याने डहाणूतील धुंडलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील एक मजूर गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

पालघर मनोर रस्ता हा चौपदरीकरणासाठी प्रस्तावित असून मंजुरी मिळाल्यास कामाला सुरुवात करण्यात येईल. तसेच या रस्तावर असलेल्या अपघातप्रवण क्षेत्र भागात तसे फलक लावण्यात येतील.
– विकास पिंपळकर, उप अभियंता, महामार्ग प्राधिकरण

पालघर मनोर रस्ता हा महामार्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तरीही या रस्त्यावर महामार्गावरील सोयी नसल्याने तसेच रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. पालघर घाटात बहुतेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेले सुरक्षा कठडे तुटलेले असल्याने जर एखादे वाहन चालकाच्या नजर चुकीने नियंत्रण बाहेर गेल्यास अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गाचे काम हे महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यात्यारीत येत असल्याने आणि प्राधिकरणाचे कार्यालय हे ठाणे येथे असल्याने नागरिकांना काही सूचना करायच्या असल्यास त्यांना ठाणे गाठावे लागते. म्हणून सहसा कुठलाही सामान्य नागरिक अथवा समाजसेवक जाणीवपूर्वक या रस्त्याबाबत तक्रार अथवा अपघात प्रवनक्षेत्राबाबत सूचना करायला जात नाही.

- Advertisement -

हेही वाचा –

शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड पक्ष, मुंबईला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी सज्ज व्हा – देवेंद्र फडणवीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -