वांद्री धरणात बुडून मुंबईच्या दोन तरुणांचा मृत्यू

धरणाच्या पाण्यात पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाल्याने दोघांचा मृत्यू झाला.

मनोर: गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील दोन तरुणांचा वांद्री धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. होळीच्या निमित्ताने सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वांद्री दोघेही धरण परिसरात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.धरणाच्या पाण्यात पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाल्याने दोघांचा मृत्यू झाला.स्वप्निल विजय मस्के (वय. 27) आणि अजय पांडुरंग साळवे (वय.26) अशी मयत तरुणांची नावे असून दोघेही मुंबईचे रहिवासी होते.

मुंबईच्या मालाड आणि कांदिवली भागातील मालवणी परिसरातील स्वप्नील म्हस्के आणि अजय साळवे मंगळवारी दुपारी मुंबई वरून मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण परिसरात पर्यटनाच्या निमित्ताने आले होते.धरण परिसरात फिरत असताना वांद्री धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह न आवरल्याने दोघेही पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते.पाण्यात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघेही बुडाल्याची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.मंगळवारी सायंकाळी उशिरा एक मृतदेह हाती लागला होता. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गांजे गावच्या ग्रामस्थांनी एकत्र येत धरणाच्या पाण्यात उतरून बुडालेला मृतदेह शोधून काढला.पंचनामा करून दोन्ही मृतदेह मनोर पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले होते.