घरपालघरआदिवासी जमिनीवर अनधिकृत बांधकाम

आदिवासी जमिनीवर अनधिकृत बांधकाम

Subscribe

याविषयीचा अहवाल मागवण्यात आला होता. या अहवालामध्ये दिलेल्या माहिती नुसार संबंधीत जागेवर झालेले बांधकाम अवैध असल्याचा अभिप्राय देण्यात आला आहे.

पालघर/डहाणू :डहाणू तालुक्यातील आशागड येथे जमीन महसूल अधिनियमातील कुळकायद्याला पात्र असलेल्या जमिनीचा अकृषिक वापर करून या जमिनीवर अवैधरीत्या बांधकाम करण्यात आले आहे. या विरुद्ध महसूल विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी ही कारवाई केली जात नाही. आशागड जामशेत राज्य मार्गाच्या शेजारी गट क्रं. 32 क्षेत्र 0.61.0 या जमिनीवर महसूल अधिनियम 1966 चे कलम 36, 36अ कुळकायदा 43 ला पात्र असलेल्या कृषिक जागेचा अकृषिक वापर करून या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. यातील एका खातेदाराने गावातील काही ग्रामस्थांना सोबत घेऊन याठिकाणी बांधकाम केले आहे. याविषयी इतर खातेदारांनी विरोध दर्शवला असता त्यांना दमदाटी करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सातबारा धारक करत आहेत. येथील जमिनीच्या सात बार्‍यामध्ये एकूण 11 जणांची नाव असून यातील एका खातेदाराने इतरांना विश्वासात न घेता हे बांधकाम केल्याचा आरोप इतर खातेदारांनी केला आहे. याविषयी इतरांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली. त्यानुसार तहसीलदार कार्यालयाकडून चौकशी करून संबंधित महसूल विभागाकडून (तलाठी कार्यालयाकडून) याविषयीचा अहवाल मागवण्यात आला होता. या अहवालामध्ये दिलेल्या माहिती नुसार संबंधीत जागेवर झालेले बांधकाम अवैध असल्याचा अभिप्राय देण्यात आला आहे.

 

- Advertisement -

आमच्या सामायिक जागेवर एका खातेदाराने काही ग्रामस्थांच्या सहकार्याने अवैध रित्या बांधकाम केले आहे. आम्ही इतर खातेदारांनी विरोध केला असता आम्हाला दमदाटी करून मारहाण करण्याचा प्रयत्न संबंधितांनी केला आहे.
– तुळशी कोल्हा, सातबारा धारक

याविषयी आशागड येथील मंडळ अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
अभिजित देशमुख,तहसीलदार डहाणू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -