घरपालघरअनधिकृत बांधकामाने घेतला गरीब महिलेचा जीव

अनधिकृत बांधकामाने घेतला गरीब महिलेचा जीव

Subscribe

घटना घडली त्यावेळी रेणू यांच्यासोबत त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा होता, पण, सुदैवाने त्याला कोणतीही इजा झाली नाही.

वसई : माणिकपूर शहरात अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु असताना सज्जा कोसळल्याने खाली असलेल्या रिक्षातील तीन प्रवासी जखमी झाले होते. त्यातील एका महिलेचा बुधवारी संध्याकाळी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. माणिकपूर शहरात बहुमजली अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु आहे. सोमवारी दुपारी या इमारतीचा सज्जा खाली असलेल्या रिक्षा स्टँडवरील दोन रिक्षांवर पडला होता. त्यावेळी एका रिक्षातील तीन प्रवाशी जखमी झाले होते. त्यातील रेणू गुप्ता (३५) या महिलेची प्रकृत्ती चिंताजनक झाल्याने तिला पुढील उपाचारासाठी मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना रेणू गुप्ता यांचा बुधवारी संध्याकाळी मृत्यू झाला. रेणू गुप्ता फळविक्रेत्या असून त्यांना चार मुले आहेत. पती कोणतेही कामधंदा करत नसल्याने त्यांच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. पण, त्यांचा मृत्यू झाल्याने गुप्ता कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. घटना घडली त्यावेळी रेणू यांच्यासोबत त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा होता, पण, सुदैवाने त्याला कोणतीही इजा झाली नाही.

दरम्यान, नवघर-माणिकपूर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त ग्लिसन घोन्सालवीस यांनी २७ डिसेंबर २२ रोजी अनधिकृत बांधकामाला नोटीस बजावली होती. बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्यात आली नाही तर बांधकाम निष्कासित करण्यात येईल. तसेच अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही नोटीसीत म्हटले होते. त्यानंतरही अनधिकृत बांधकाम सुरु होते. महापालिकेने त्यावर कोणतीच कारवाई केली नव्हती. परिणामी अनधिकृत बांधकामामुळे एका गरीब महिलेचा नाहक बळी गेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -