विरार : वसई- विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले होते. याच अनुषंगाने गुरुवारी १२ डिसेंबर रोजी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे तसेच उपआयुक्त अजित मुठे यांच्या आदेशानुसार प्रभाग समिती अंतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पालिकेच्या पथकाने १७ हजार चौरस फुटाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याची नोंद झाली आहे. या कारवाईमध्ये गाव मौजे बापाने सर्वे क्रमांक ४२ तसेच ४३ येथील ३ गाळे अंदाजे १५ हजार चौ .फु. औद्योगिक गाळा बांधकाम निष्काशीत करण्यात आले. तसेच गाव मौजे बापाने शिव साई हॉटेल येथे २ गाळे अंदाजे २ हजार चौ .फु. अनधिकृत बांधकाम तसेच चिंचोटी सर्वे क्रमांक ३३ खुरेशी कंपाउंड येथे नदीपात्रातील माती भराव व दगडी पायाचे बांधकाम निष्काशीत करण्यात आले आहे. सदर मोहिमेत एकूण १७ हजार चौरस फुटांचे पत्रा वीट बांधकाम तोडण्यात आले.तसेच केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. या मोहिमेत प्रभाग समिती जी विभागाच्या सहायक आयुक्त नीता कोरे तसेच कौस्तुभ तामोरे, विवेक घुटूकडे , जितेश पाटील (कनिष्ठ अभियंता ) मजूर कर्मचारी तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी (एमएसएफ) उपस्थित होते.
Unauthorized Constructions : १७ हजार चौरस फुटांची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
written By My Mahanagar Team
virar
सदर मोहिमेत एकूण १७ हजार चौरस फुटांचे पत्रा वीट बांधकाम तोडण्यात आले.तसेच केलेले अतिक्रमण हटविण्यात आले.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -