Eco friendly bappa Competition
घर पालघर चिमाजी अप्पा स्मारक परिसरात अनधिकृत बांधकामे?

चिमाजी अप्पा स्मारक परिसरात अनधिकृत बांधकामे?

Subscribe

वसई किल्ल्याला सागरी आक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि युद्धकाळात हल्ले करण्यासाठी चिमाजी अप्पांनी येथे एक बुर्ज बांधला होता.

भाईंदरः भाईंदर पश्चिमेकडील उत्तन चौक येथील ऐतिहासिक जंजिरे धारावी किल्ला आणि आसपासच्या परिसरात अनधिकृत बांधकाम करण्यात येत असल्याची तक्रार किल्ला जतन समितीने महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाकडे ( एमसीझेडएमए ) कडे केली होता. या तक्रारीची दखल घेत चिमाजी अप्पा स्मारकाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना प्राधिकरणाचे अवर सचिव संजय संदनशिव यांनी ठाणे जिल्हाधिकारी व मीरा- भाईंदर महापालिका आयुक्तांना केल्या आहेत. मीरा -भाईंदर महापालिका हद्दीत असलेल्या भाईंदर पश्चिमेला ऐतिहासिक जंजिरे धारावी किल्ला आहे. पश्चिम किनार्‍याला पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या चिमाजी अप्पांनी १७३९ साली हा किल्ला जिंकला होता. वसई किल्ल्याला सागरी आक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि युद्धकाळात हल्ले करण्यासाठी चिमाजी अप्पांनी येथे एक बुर्ज बांधला होता.

या किल्ल्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे किल्ल्याची भग्नावस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वी किल्ल्याच्या बाजूला असलेली तिवरांची झाडे तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु पोलिसांनी अद्यापपर्यंत आरोपीला अटक केलेली नाही. जंजिरे धारावी किल्ला जतन समितीशी संलग्न असलेल्या स्वयंसेवकांनी किल्ला व चिमाजी अप्पा स्मारक परिसरात महापालिका बेकायदेशीरपणे बांधकाम करत असल्याची तक्रार महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे केली होती. महापालिकेला चिमाजी अप्पा स्मारक परिसरात गॅजेबो व इतर काम करण्याची परवानगी दिली आहे. परंतु महापालिका स्मारक परिसरात काम न करता किल्ला परिसरात काम करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण ( एमसीझेडएमए ) ने घेत ठाणे जिल्हाधिकारी व मीरा- भाईंदर महापालिका आयुक्तांना चौकशी करून पडताळणीनंतर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच लवकरात लवकर तपशीलवार कार्यवाही अहवाल सादर करण्याचे आदेश अवर सचिव (पर्यावरण विभाग) संजय संदनशिव यांनी दिले आहेत.

- Advertisement -

 

किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने २५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. मीरा- भाईंदर महापालिकेने ३ कोटी रुपये निधी देण्यास मान्यता दिली आहे. राज्य शासनाने १० कोटी निधी महापालिकेला वर्ग केला आहे. किल्ला परिसरात अनेक मद्यपी मद्यपान करत असल्याचे उघडकीस आले आहे. महापालिकेकडून किल्ल्याची सुरक्षा व्यवस्था सांभाळली जात नसल्याने असे प्रकार घडत आहेत. किल्ला परिसरात खाली दारूच्या बाटल्या सापडल्या होत्या. त्याबाबत वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची राज्य मानवी हक्क आयोगाने स्वतःहून दखल घेतली होती. त्याबाबत महापालिकेला किल्ल्याची सुरक्षा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर महापालिकेने किल्ला परिसरात १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. पोलिसांची गस्त देखील वाढवण्यात आली होती. जंजिरे धारावी किल्ला व नरवीर चिमाजी अप्पा स्मारकाचे जतन व संवर्धन करण्यासाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे अधिकारी यांनी सर्वेक्षण आणि स्थळ पाहणी देखील केली आहे.

- Advertisement -

 

महापालिकेला बांधकाम करण्याची रितसर परवानगी मिळाली असून त्यानुसार गॅजेबो आणि इतर बांधकाम करण्यात येत आहे. कोणतेही बेकायदेशीर बांधकाम केले जात नाही. बांधकाम अटी आणि शर्तीनुसारच केले जात आहे.

— दिपक खांबीत, शहर अभियंता , मीरा भाईंदर महापालिका –

- Advertisment -