Eco friendly bappa Competition
घर पालघर दारशेत वैतरणा नदीपात्रात अनधिकृत रेती उत्खनन

दारशेत वैतरणा नदीपात्रात अनधिकृत रेती उत्खनन

Subscribe

सफाळे पूर्व भागात शुक्रवारी संध्याकाळी महसुल व पोलीस संयुक्तपणे कांदळवन जेटी बंदरातून खासगी बोटीने गस्त घालत असताना दारशेत वैतरणा नदीपात्राच्या किनार्‍यालगत अनधिकृत रेती उत्खनन करताना आढळून आले.

सफाळे: पालघर तालुक्यातील सफाळे पूर्वपट्टीतील दारशेत -वैतरणा नदीपात्राच्या किनार्‍यालगत अनधिकृत रेती उत्खनन करणार्‍यांवर पारगाव येथील तलाठी व सफाळे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी शुक्रवारी कारवाई केली. यात बोटीसह 1 लाख ८९ हजार ५१५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले. सफाळे पूर्व भागात शुक्रवारी संध्याकाळी महसुल व पोलीस संयुक्तपणे कांदळवन जेटी बंदरातून खासगी बोटीने गस्त घालत असताना दारशेत वैतरणा नदीपात्राच्या किनार्‍यालगत अनधिकृत रेती उत्खनन करताना आढळून आले.

पारगाव सजेचे तलाठी किरण जोगदंड व सफाळे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या संयुक्त कारवाईत एक बोट जप्त करण्यात आली. बोट मालक दिपक विनायक पाटील व समीर विष्णु घरत यांना शुक्रवारी रात्री अटक करून सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले.पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे, उपनिरीक्षक सावंत, तलाठी किरण जोगदंड, महेंद्र शर्मा, कैलास शेळके, आनंद खोत, नारायण धौंदडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -