घरपालघरनिसर्गाच्या लहरीपणामुळे वीटभट्टीवर अवकाळीचे पाणी

निसर्गाच्या लहरीपणामुळे वीटभट्टीवर अवकाळीचे पाणी

Subscribe

बांधकाम क्षेत्राचा कणा असलेला वीटभट्टी व्यवसाय अवकाळी पावसाने संकटात सापडला आहे. डिसेंबर महिना सुरू झाला असला तरी जिल्ह्यातील पावसाने उघडीप दिली नाही.

बांधकाम क्षेत्राचा कणा असलेला वीटभट्टी व्यवसाय अवकाळी पावसाने संकटात सापडला आहे. डिसेंबर महिना सुरू झाला असला तरी जिल्ह्यातील पावसाने उघडीप दिली नाही. परिणामी, भातशेती, कडधान्य शेती, भाजीपाला शेतीसह तालुक्याात महत्त्वाचा असलेला वीटभट्टी व्यवसाय संकटात सापडला आहे. परिणामी, आदिवासी कामगारांच्या रोजगारावरही संकटात आला आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोखाडा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कच्च्या विटांचा चिखल झाला आहे. लॉकडाऊनसारख्या प्रतिकूल परिस्थितीत सुरू असलेल्या विट निर्मिती उद्योगाला अवकाळी पावसाने जबर तडाखा दिला असून विट उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

अवकाळी पावसाने ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची ही पहिलीच वेळ असून या अगोदर अवकाळीचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर फटका बसला नसल्याचे बोलले जात आहे. अलिकडच्या दहा वर्षात अनेक सुशिक्षित बेरोजगार या व्यवसायात उतरल्याने स्पर्धेतून दर्जेदार विटांची निर्मिती मोखाडा तालुक्यात केली जात आहे. तालुक्या त लहान मोठे व्यवसायिक, शेतकरी शेतातील मातीचा उपयोग करून वीटभट्टी व्यवसाय करतात. बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यतक असणार्‍या बहुतांश विटांचा पुरवठा तालुक्यातूनच होतो. काही लाखांत गुंतवणूक असलेला हा व्यवसाय वीटभट्टी व्यावसायिक व कामगारांना चांगला आर्थिक लाभ मिळवून देतो. प्रतिवर्षी ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या थंडीच्या हंगामापासून अनेक ठिकाणी वीट व्यावसायिक आदिवासी कामगारांच्या मदतीने विटा पाडायला सुरुवात करतात.

- Advertisement -

दरवर्षी ऑक्टोवबरपासून वीटभट्टी हंगाम सुरू होतो. सुरुवातीची साफसफाई व माती जमा करण्याची कामे, खला करण्याची कामे ऑक्टोबरमध्ये पूर्ण झाल्यावर नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष वीट तयार होण्यास सुरुवात केली जाते. मात्र, यावर्षी लांबलेल्या पावसाने सर्वच कामे अपूर्ण आहेत. कामगार आणि बाकीची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र पावसामुळे काहीही करता येत नाही.
– रफीक शब्बीर मणियार, वीटभट्टी व्यावसायिक, लोहारपाडा, मोखाडा

यावर्षी मात्र डिसेंबर सुरू झाला असला तरी अवकाळी पाऊस सुरू आहे. परिणामी, या व्यवसायासाठी आवश्यवक असणारी पूर्वतयारी करणे अवघड झाले आहे. शेतात पाणी साचले आहे. गवत, माळरान ओले असल्याने ट्रॅक्टर जाऊ शकत नाहीत. अशा अनेक अडचणी असल्याने वीट व्यावसायिक संकटात सापडले आहेत. तालुक्यागतील बहुतांशी वीट व्यावसायिक आदल्या वर्षीच पुढील वर्षाची तयारी करतात. माती जमा करून ठेवतात. मजूर नक्की करून त्यांना आगाऊ रक्कम देतात. या सर्व तयारीत काही लाखांची रक्कम त्यांना गुंतवावी लागते. उन्हाळा वाढल्यानंतर या व्यवसायावर परिणाम होतो. त्यामुळे अनेक व्यावसायिक मार्चपूर्वीच जास्तीत जास्त वीट तयार करून त्या भट्टीत तयार करतात.

- Advertisement -

यावर्षी अद्याप तरी वीटभट्टी व्यवसाय सुरू होऊ शकत नसल्याचे अनेक व्यावसायिक सांगतात. आदिवासी कामगारांना या व्यवसायात मोठी मागणी असते. अनेक कामगार अगोदरच आगाऊ रक्कम घेऊन नक्की झालेले असतात. या व्यवसायातून चांगला रोजगार व आर्थिक लाभ त्यांना मिळतो. यावर्षी मात्र सुरुवातीचे दोन महिने पावसामुळे वाया गेले आहेत. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा रोजगार उपलब्ध नाही. काही कुशल कारागीर व कुटुंबीयांना या पावसाचा जबर फटका बसला असून रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा –

Fire in Worli House: वरळी सिलेंडर स्फोटातील अनाथ मुलाची जबाबदारी शिवसेना घेणार – महापौर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -