Eco friendly bappa Competition
घर पालघर एआयचा वापर करून मुलींचे अश्लिल फोटो बनवले

एआयचा वापर करून मुलींचे अश्लिल फोटो बनवले

Subscribe

त्याचा वापर करून त्याने इन्स्टाग्रामवर बनावट खाती उघडून मुलींची बदनामी होत होती. यातील दोन मुली जाब विचारण्यासाठी गेल्या असता जितचा भाऊ यशने दोघींना बेदम मारहाण केली.

वसईः वसई तालुक्यातील कळंब गावात राहणार्‍या दोन सख्या भावांनी एआय अ‍ॅपचा वापर करून गावातीलच
अल्पवयीन मुलींचे अश्लिल फोटो बनवले. सदर फोटो वायरल करण्याची धमकी देत लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्नही केला. याप्रकरणी जाब विचारला गेलेल्या पिडीत मुलीलाच बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन्ही भावांना अटक करण्यात आली आहे. जीत नरहर निजाई (१९) आणि यश नरहर निजाई (२२) अशी आरोपींची नावे असून दोघेही मुंबई पोलीस दलात कांदीवली पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिसाची मुले आहेत. जित निजाईने एआयचा (कृत्रिम बुद्धीमत्ता) वापर करून गावातील अनेक तरुणींची अश्लिल छायाचित्रे तयार केली होती. त्याचा वापर करून त्याने इन्स्टाग्रामवर बनावट खाती उघडून मुलींची बदनामी होत होती. यातील दोन मुली जाब विचारण्यासाठी गेल्या असता जितचा भाऊ यशने दोघींना बेदम मारहाण केली.

त्यामुळे पीडित मुलगी या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेली असता आरोपीने तिलाच बेदम मारहाण केल्याने या प्रकारावरून संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी सोमवारी रात्री अर्नाळा पोलीस ठाण्याला घेराव घालून आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती. तेव्हा अर्नाळा पोलिसांनी जीत आणि त्याचा भाऊ यश यांच्यावर विनयभंग, माहिती तंत्रज्ञान कायदा, बालकांवरील लैंगिक अत्याचार विरोधी कायदा (पोक्सो) आदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे. आरोपी भावंडे गावातील अनेक तरुणींचे सोशल मीडियावरील फोटो टेलिग्राम ऍपवरून एआयचा वापर करून एडिट करून मॉर्प करायचे. त्यानंतर इन्स्टाग्रामवर बोगस अकाऊंट बनवून अश्लिल फोटो वायरल करायची धमकी देत त्यांनी लैंगिक शोषण करायचा प्रयत्न केला होता.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -