घरपालघरचक्क बांधकाम विभागाच्या गटाराची तोडफोड

चक्क बांधकाम विभागाच्या गटाराची तोडफोड

Subscribe

मात्र कसलीही कारवाई होत नसून राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि जिप बांधकाम अधिकारी मात्र मूग गिळून बसल्याचे दिसून येत आहे.

ज्ञानेश्वर पालवे,मोखाडा : जलजीवन मिशन अंतर्गत सुरू पाईपलाईनच्या कामाच्या विरोधात दररोज असंख्य तक्रारी येत असतानाही संबधीत ठेकेदारांवर कसलीही कारवाई होत नसल्याचे समोर येत असतानाच आता चक्क रस्ते खराब होवू नये यासाठी रस्त्याच्या बाजुला बांधलेल्या गटाराचे जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकल्याचे चित्र समोर आले. असून सगळे नियम पायदळी तुडवून वाटेल तसे काम करणार्‍या या ठेकेदारावर मात्र कसलीही कारवाई होत नसून राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि जिप बांधकाम अधिकारी मात्र मूग गिळून बसल्याचे दिसून येत आहे.

संपूर्ण तालुक्यात नियमबाह्य पद्धतीने रस्त्यांच्या शेजारीच किंबहुना रस्तेच खोदण्याचे काम सर्रास या ठेकेदाराकडून चाललेले आहेत. याबाबत आजवर ढिगभरुन लेखी आणि तोंडी तक्रारी संबधीत अधिकारी आणि तहसीलदारांकडे आलेल्या आहेत. याबाबत संबंधित अधिकारी यांना जाब विचारताच काम बंद असल्याचे सांगितले जाते. मात्र काम कुठेही बंद असल्याचे दिसत नाही. रस्ते खोदल्यामुळे काही गावांची तर बससेवा बंद झाली आहे.कुठे डांबरी रस्त्यावर पोकलेन चालवल्यामुळे रस्ता खचला आहे.अशातच आता चास या गावाजवळ जाणार्‍या उताराच्या रस्त्यावर लाखो रुपये खर्चून गटार बांधण्यात आली होती.मात्र पाईपलाईनच्या कामासाठी चक्क गटारच उखडून टाकली आहेत. यामुळे पावसाळ्यात रस्ता वाहून जाईलच मात्र गटारीद्वारे जाणारे पाणी रस्त्यावर येवून पूर्णतःवाताहात होण्याची दाट शक्यता आहे. या घटनेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विशाल अहिरराव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी, गटारे खोदून काढली आहेत की नाही मी प्रत्यक्षात पाहिले नाही. मी मंत्रालयात आहे. माझे सहकारी इंजिनिअर मानकर यांना बघायला पाठवतो आणि सांगतो,असे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -