Homeपालघरविविध दाखले, परवाने आता ऑनलाईन

विविध दाखले, परवाने आता ऑनलाईन

Subscribe

सदर सेवांचा लाभ आपले सरकार पोर्टल वरुन घेत असल्यास आपले सरकार पोर्टलचे शुल्क लागू असतील तर ते देखील शुल्क ऑनलाईन पेमेंटद्वारे करावे लागतील, अशी माहिती उपायुक्त समीर भुमकर यांनी दिली.

वसईः वसईकरांना आता विविध ५१ प्रकारचे दाखले, परवाने आता ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. त्यासाठी वसई विरार महापालिकेने सेवा हमी कायदा संगणक प्रणाली विकसित करण्य़ात आली असून विहित मुदतीत दाखले आणि परवाने उपलब्ध करून दिले जाणार आहेत.  त्यामुळे वसईकरांना महापालिकेत हेलपाटे मारावे लागणार नाहीत.जन्म-मृत्यू दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्रे, नळजोडणी, अग्निशमन परवाना, व्यवसाय परवाना यासह विविध दाखल्यांसाठी नागरीकांना महापालिकेत हेलपाटे मारावे लागतात. वेळेत दाखला, परवाना मिळत नसल्याने नागरीकांची गैरसोय होत होती, वेळही वाया जात होता. त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव होता. म्हणूनच महापालिकेने सेवा हमी कायदा संगणक प्रणाली विकसित केली असून आता ऑनलाईन पध्दतीने दाखले तेही वेळेत उपलब्ध होणार आहेत.

सदर सेवांचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घेणेकरता https://rtsvvmc.in/vvcmcrts/ या प्रणालीवर भेट देऊन नागरिक स्वतःचा स्वतंत्र लागिंग आयडी तयार करून ५१ सेवांपैकी हव्या असलेल्या सेवे करता ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. नागरिकांना सदर अर्ज शुल्क भरणा करणे करता पेमेंट गेटवे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर ५१ सेवांपैकी मालमत्ता करांच्या सेवांसाठी ऑनलाईन पेमेंट करताना लागणारा अतिरिक्त शुल्क वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे सहजरित्या अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज दाखल केल्यानंतर नोंदणी क्रमांक व पावतीत्वरित प्राप्त होईल. त्याद्वारे नागरिक आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकतात. नागरिकांना सदर सेवेचे प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होणार आहे. तसेच सदर सेवा हमी कायदा (RTS) पोर्टल हे आपले सरकार पोर्टल सोबत जोडण्यात आले असून सदर सेवांचा आपले सरकार पोर्टल वरुन देखील लाभ घेता येऊ शकतो. सेवांचे शुल्कांचे पेमेंट ऑनलाईन करावयाचे असून सदर सेवांचा लाभ आपले सरकार पोर्टल वरुन घेत असल्यास आपले सरकार पोर्टलचे शुल्क लागू असतील तर ते देखील शुल्क ऑनलाईन पेमेंटद्वारे करावे लागतील, अशी माहिती उपायुक्त समीर भुमकर यांनी दिली.

०००

ऑनलाईन सेवा आणि कालावधी …

 जन्म-मृत्यू प्रमाणपत्र (तीन दिवस)

० विवाह नोंदणी प्रमाणपत्र (३६ कामकाज दिवस)

० नवीन नळजोडणी (१५ कामकाज दिवस)

० नळजोडणी आकारात बदल करणे (१५ दिवस)

० नळजोडणी तात्पुरती/कायमस्वरुपी खंडित करणे (सात दिवस)

० पाणीपुरवठा देयक तयार करणे (तीन दिवस)

० प्लंबर परवाना (१५ दिवस)

० प्लंबर परवाना नुतनीकरण करणे (१५ दिवस)

० थकबाकी नसल्याचा दाखला (१५ दिवस)

० सदोष मिटरची तक्रार (सात दिवस)

० अग्निशमन ना हरकत दाखला ( सात दिवस)

० नवीन परवाना व नुतनीकरण (३० दिवस)

० मालकी आकारात बदल करणे (सात दिवस)

० नवीन मालमत्ता कर नोंदणी ( १५ दिवस)

० झोन दाखला (सात दिवस)

० रस्ता खोदाई परवानगी ( ३० दिवस)