घरपालघरमहापालिकेकडून विविध स्पर्धांचे आयोजन

महापालिकेकडून विविध स्पर्धांचे आयोजन

Subscribe

नागरिकांनी या स्टॉल्सना भेट देऊन पर्यावरण व संस्कृती संवर्धनासाठी तयार करण्यात आलेल्या वस्तूंची जास्तीत जास्त खरेदी करावी असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

भाईंदर :- महाराष्ट्र शासनाच्या”माझी वसुंधरा” अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन जनजागृतीसाठी ९ ते ११ फेब्रुवारी या तीन दिवसांसाठी मीरा- भाईंदर महापालिकेकडून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा आणि कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त संजय काटकर यांनी केले आहे. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या वसुंधरा महोत्सवाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. पंचतत्वावर आधारित असलेल्या मूल्यांच्या माहितीची जनजागृती करण्यासाठी वसुंधरा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या वसुंधरा महोत्सवात पर्यावरण व संस्कृती संवर्धनासाठी विविध प्रकारचे भव्य विक्री प्रदर्शन, औषधी वनस्पती, बी-बियाणे रोपे, नर्सरी, आयुर्वेदिक व सौंदर्य उत्पादने, हस्तकला व हॅण्डलुम उत्पादने, विविध प्रकारचे, अलंकार, खाद्यसंस्कृती, पर्यावरण संवर्धन प्रकल्प जसे की सोलार सेल्स, सोलार बॅटरी, ईव्ही चार्जिंग पॉइंट्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग, लाईव्ह फूड काऊंटर इत्यादी श्रेणीतील प्रदर्शन भरवण्यासाठी १०० स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. नागरिकांनी या स्टॉल्सना भेट देऊन पर्यावरण व संस्कृती संवर्धनासाठी तयार करण्यात आलेल्या वस्तूंची जास्तीत जास्त खरेदी करावी असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

त्याचबरोबर मनोरंजनासाठी विविध कलाकार, बालकलाकार, शालेय विद्यार्थी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महिला सशक्तीकरण व स्वच्छता या विषयांशी निगडित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रकला स्पर्धेत ६ वी ते ८ वी व ८ वी वरील असे दोन गट करण्यात आले असून दोन्ही गटासाठी रोख रक्कम स्वरूपात पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तर ११ फेब्रुवारी रोजी महापालिका आयोजित किल्ला सायक्लोथॉन २०२४ चा शुभारंभ भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र बोस मैदान येथे आयुक्त यांच्या हस्ते सकाळी ६ वाजता होणार आहे. स्पर्धेची सुरुवात सुभाषचंद्र बोस मैदान येथून होणार असून सुभाषचंद्र बोस मैदान ते जंजिरे किल्ला ते मॅक्सस मॉल पोलीस चौकी ते पुन्हा सुभाषचंद्र बोस मैदान येथे समाप्त करण्यात येणार असून ही स्पर्धा २१ किमी अंतराची असणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता वसुंधरा महोत्सव २०२४ अंतर्गत समारोप कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी पैठणीचा खेळ आयोजित केला असून यामध्ये महिलांसाठी तीन विजेत्या महिलांना पैठणी स्वरूपात पारितोषिक देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -