घर पालघर मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात वर्तक कॉलेजचा झेंडा

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात वर्तक कॉलेजचा झेंडा

Subscribe

मागील वर्षी झालेल्या ५५ व्या युवा महोत्सवात अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाने झोन क्रमांक ५ चा विभागीय करंडक जिंकला होता.

वसईः मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत वसईच्या अण्णासाहेब वर्तक कॉलेजने सर्वाधिक २२ पारितोषिके पटकावत युवा महोत्सवातील आपला दबदबा कायम ठेवला. पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात पार पडलेल्या प्राथमिक फेरीत बोरीवली ते डहाणू परिसरातील २९ महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले होते. मागील वर्षी झालेल्या ५५ व्या युवा महोत्सवात अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाने झोन क्रमांक ५ चा विभागीय करंडक जिंकला होता. यावर्षीसुद्धा महाविद्यालयाने एकांकिका (मराठी), एकपात्री अभिनय (मराठी), कथाकथन (मराठी), वक्तृत्व (मराठी), वादविवाद (इंग्रजी), पाश्चात्य वाद्यवादन (एकल) आणि मेहंदी अशा स्पर्धाप्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला. लोकनृत्य, नाटुकली (मराठी) नाटुकली (हिंदी), भारतीय सुगमसंगीत (एकल), नाट्यसंगीत (एकल), चित्रकला आणि भित्तीचित्र अशा स्पर्धांप्रकारांत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

पाश्चात्य समूहगीत, पाश्चात्य गायन (एकल) आणि व्यंगचित्र स्पर्धाप्रकारांत तृतीय क्रमांक तर भारतीय समूहगीत, कोलाज, मातीकला, वक्तृत्व (इंग्रजी) आणि एकांकिका (हिंदी) या स्पर्धा प्रकारांमध्ये उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या यशाबद्दल विद्यावर्धिनी शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष विकास वर्तक तसेच सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, उपप्राचार्य डॉ. जानकी सावगाव, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके, प्रबंधक दिलीप वर्तक, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सखाराम डाखोरे, सदस्य प्रा. अम्रिता जाधव, डॉ. मनोहर भगीरथ, डॉ. विजयानंद बनसोडे, प्रा. शैलेश औटी, डॉ. श्रीराम डोंगरे, प्रा. पियुष राणा, प्रा. लतिका पाटील, प्रा. देविका गावड, प्रा. स्नेहल राऊत, प्रा. सिद्धार्थ सिरसाट, प्रा. सचिन धोडी, प्रा. किरण पांचाळ, प्रा. वंदना केडिया, प्रा. पल्लवी अहिरे, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. माधव पवार, प्रा. ज्योती ठाणकर, विद्यार्थी प्रतिनिधी नितीन पवार, सहाय्यक विद्यार्थी प्रतिनिधी सचिन दुबे, विद्यार्थिनी प्रतिनिधी युतिका पावसकर, सहाय्यक विद्यार्थिनी प्रतिनिधी श्रुती जाधव, सांस्कृतिक समितीच्या सर्व विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शकांचे व कलावंतांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -