विरार : वसई- विरारमध्ये काही फेरीवाल्यांनी वसईकरांच्या तोंडाचा घास कडू करण्याचा प्रकार सुरू केला आहे. फेरीवाले विकत असलेल्या जिन्नस, वस्तू, भाजीपाला, फळे यांच्या मापात पाप करत आहेत. खुलेआम वजन काट्यात फेरफार करून ग्राहकांना कमी वजनाच्या वस्तू विकत आहेत. नालासोपारा परिसरात अनेक फेरीवाले अशा पद्धतीने ग्राहकांना फसवत असल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. वसई- विरारमध्ये मध्यमवर्गीय नागरिकांचे वास्तव्य आहे.त्यात अनेकांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न उभे राहिले आहेत. यामुळे ढासळलेली आर्थिक परिस्थिती आणि वेळे अभावी अनेक नागरिक रस्त्याच्या बाजूला असलेल्या फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करतात. करोनानंतर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. नालासोपार्यात फेरीवाले रस्त्यावर उभे राहून विकत असलेल्या वस्तू मोजताना वजन काट्याच्या खाली अनेकवेळा धातूच्या चकत्या, लोहचुंबक, अथवा अधिक वजनाचे धातूचे भांडे वापरतात. तर काही जण वस्तू गुंडाळून देताना हातचलाखीने पिशव्या बदलतात. असे प्रकार सातत्याने घडत आहेत. नागरिक घाईत असल्याने ही चोरी पकडू शकत नाहीत. पण या फेरीवाल्यांवर कारवाई कण्यासाठी कोणतही प्रशासन पुढे येत नसल्याचे नागरिकांची ही फसवणूक अनेक वर्षापासून सुरु आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. दुसरी बाब म्हणजे हे फेरीवाले वापरत असलेले वजन काटे हे कालबाह्य झाले आहेत. त्यांची कोणतीही तपासणी केली जात नाही. यामुळे या वजनाची परिमाणे किती खरी याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. तर वसई -विरार परिसरात ५० हजारांहून अधिक फेरीवाले आहेत. त्यांच्याकडे असलेल्या वजनकाट्यांची आजतयागत कोणतीही पालिकेच्या फेरीवाले विभागाने चाचणी केली जात नाही. यामुळे हे वजनकाटे किती योग्य प्रमाणात वजन करतात यावर शंका अनेकांनी उपस्थित केल्या आहेत.
Vasai Hawkers :फेरीवाल्यांकडून वजन काट्याद्वारे फसवणूक होत असल्याची नागरिकांची तक्रार
written By My Mahanagar Team
virar
तर वसई -विरार परिसरात ५० हजारांहून अधिक फेरीवाले आहेत. त्यांच्याकडे असलेल्या वजनकाट्यांची आजतयागत कोणतीही पालिकेच्या फेरीवाले विभागाने चाचणी केली जात नाही. यामुळे हे वजनकाटे किती योग्य प्रमाणात वजन करतात यावर शंका अनेकांनी उपस्थित केल्या आहेत.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -