वसई: यंग स्टार्स ट्रस्ट पुरस्कृत, वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आयोजित, वामन हरी पेठे ज्वेलर्स वसई विरार श्रावण सुंदरी २०२३ या महिलांसाठी आयोजित सौंदर्य स्पर्धेची प्राथमिक फेरी जुने विवा कॉलेज विरार (प) येथे पार पडली.
या स्पर्धेवेळी प्रथम महिला महापौर प्रविणा ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, विरार प्रभाग समितीचे माजी सभापती पंकज ठाकूर इत्यादि मान्यवरांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती माया चौधरी यांच्या हस्ते, वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळाचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी, वसई- विरारमधील अनेक माजी नगरसेवक आणि नगरसेविका यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलनाने स्पर्धेस सुरूवात करण्यात आली. सदर प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्या मेधा महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या.
तसेच प्रथमच आयोजित केलेल्या स्पर्धेच्या या भव्य व नेटक्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
परिक्षक म्हणून फिल्म दिग्दर्शक शिवकुमार पार्थसारथी, आषुतोश पगारे, अभिनेत्री सुषमा शिरोडकर, अभिनय मार्गदर्शक समीर राणे, नाट्य लेखक व दिग्दर्शक विलास पागार, मिसेस इंडिया दिव्या शिवदास, समाजसेविका वंदना वर्तक, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. दिपा वर्मा, फॅशन डिझायनर सिद्ध भट इत्यादींनी यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळली. या प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या स्पर्धकांची उपांत्य फेरी रविवारी २७ अॅागस्ट २०२३ रोजी नविन विवा कॅालेज, विरार प. येथे संपन्न होणार असून त्यातून निवडल्या जाणार्या स्पर्धकांची अंतिम फेरी रविवारी ३ सप्टेंबर २३ रोजी अनंतराव ठाकूर नाट्यगृह, पारनाका, वसई येथे होणार आहे.
गट 1 मिस श्रावण सुंदरी – वय 18 ते 35 वर्षे, अविवाहित तसेच एकल महिलांसाठी.
गट 2 मिसेस श्रावण सुंदरी *- वय 18 ते 35 वर्षे, विवाहित महिलांसाठी.
गट 3 इलाईट श्रावण सुंदरी – वय 35 वर्षांवरील सर्व महिलांसाठी