Eco friendly bappa Competition
घर पालघर वादळीवार्‍यामुळे वसई- विरारचा पाणीपुरवठा विस्कळीत

वादळीवार्‍यामुळे वसई- विरारचा पाणीपुरवठा विस्कळीत

Subscribe

महापालिकेला सूर्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी मासवण येथे पम्पिंग स्टेशन आणि धुकटन येथे जलशुध्दीकरण प्रकल्प आहे. वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडल्याने यापरिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता.

वसईः मंगळवारी पहाटे जोरदार वारा, वादळ आणि विजेच्या गडगडाटासह पालघर जिल्हयात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे महावितरणच्या वीज पुरवठ्यात बिघाड झाल्याने मासवन पम्पिंग स्टेशन आणि धुकटन जलशुध्दीकरण केंद्रातीला वीज पुरवठा खंडीत झाला आहे. परिणामी वसई विरार महापालिका हद्दीत सूर्या योजनेतील पाणी पुरवठा ठप्प होऊन पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवारी पहाटे पालघर जिल्ह्यात वादळी वार्‍यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याचा फटका वसई- विरार महापालिका हद्दीतील पाणी पुरवठ्यावर झाला आहे.

महापालिकेला सूर्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी मासवण येथे पम्पिंग स्टेशन आणि धुकटन येथे जलशुध्दीकरण प्रकल्प आहे. वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडल्याने यापरिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. महावितरणकडून दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पण, वारा-वादळ आणि पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत होते. मंगळवारी संध्याकाळपर्यंत यापरिसरातील वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने वसई- विरार महापालिका हद्दीत होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. वीज पुरवठा पूर्ववत होत नाही तोपर्यंत सूर्या पाणी पुरवठा योजनेतून होणारा पाणी पुरवठा बंद होता. परिणामी मंगळवारी वसई विरारमधील पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -