घरपालघरदगड खदानीच्या विळख्याने विजयगड गाव धोक्याच्या छायेत

दगड खदानीच्या विळख्याने विजयगड गाव धोक्याच्या छायेत

Subscribe

भात शेतीसह घरांची ही हानी होणार आहे. तरीदेखील मात्र याकडे प्रशासन गांभीर्याने बघत नसल्याने येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

वसंत भोईर, वाडा । तालुक्यातील डोंगस्ते ग्रामपंचायतीच्या हद्दीत विजयगड गावात असलेल्या दगड खदानीच्या सुरुंग स्फोटाने विजयगड गावात प्रचंड हादरे बसत असून येथील घरांना तडे गेले आहेत. तर नागरिक झोपेतून जागे होत आहेत. स्फोट होताच घरातील भांडी पडण्याचे प्रकार घडत आहेत. या आवाजामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. शिवाय गेल्या कित्येक वर्षाचा परंपरागत असलेला नैसर्गिक नाल्यात या खदान मालकाने दगड मातीचा भराव करून बंद केल्याने डोंगरावरून उतरणारे पावसाचे संपूर्ण पाणी आता गावात घुसून शेतकर्‍यांच्या भात शेतीसह घरांची ही हानी होणार आहे. तरीदेखील मात्र याकडे प्रशासन गांभीर्याने बघत नसल्याने येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

या दगड खदान मालकाने नैसर्गिक नाला बंद केल्याने या पाण्यावर येथे अवलंबून असलेला एक तलाव आहे. त्या तलावात पाणीच येणार नसल्याने तो कोरडाच राहणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा या गावातील शेतकर्‍यांना होणार नाही. तसेच नाल्या शेजारीच या गावची स्मशानभूमी आहे. तिचेही अस्तित्व या माती भरावामूळे धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने विजयगड गावच्या नागरिकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे लक्ष घालून हा नाला पूर्ववत करावा अशी मागणी माजी उपसरपंच वैभव पष्टे यांनी केली आहे.तर नाला वगैरे बंद केलेला नसल्याचे सांगून दगड खदान मालक अशोक चव्हाण यांनी याविषयी अधिक बोलणे टाळले.तर यासंदर्भात प्रत्यक्ष जागेवर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी करून माहिती जाणून घेण्यात येईल,असे कुडूसचे मंडळ अधिकारी सदानंद भोईर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -