Eco friendly bappa Competition
घर पालघर विक्रमगडच्या किल्लेदारीवरून जोरदार रणसंग्राम

विक्रमगडच्या किल्लेदारीवरून जोरदार रणसंग्राम

Subscribe

तर शिवसेनेच्या वाडा आणि जव्हार येथे झालेल्या बैठकीत जि.प. अध्यक्ष प्रकाश निकम आणि उपसभापती प्रदिप वाघ यांनी विक्रमगडची जागा शिवसेने घ्यावी अशी मागणी केल्याने युतीत ठिणगी पडू शकते असे चित्र आहे.

मोखाडा: राज्यातील सर्वच विधानसभेच्या जागांची चाचपणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू झाली असून जिल्हा प्रभारी जिल्हा प्रमुख उपनेते यांच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा निहाय पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मुड लक्षात घेण्यासाठी शिवसेनेकडून बैठकांचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. नुकत्याच जव्हार आणि वाडा याठिकाणी दोन तालुके मिळून बैठका झाल्या. यावेळी जिल्हा निरीक्षक अशोक वैती यांच्या समोरच अनेक शिवसैनिकांनी विक्रमगड विधानसभा ही सर्वार्थाने शिवसेनेला अनुकूल आहे. यामुळे ही जागा शिवसेनेला घ्यावी, अशी थेट मागणी केली आहे.तर दुसरीकडे काहि दिवसांपूर्वीच भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी जिल्हातील लोकसभा आणि ३ विधानसभेवर भाजप जिंकणारच असा विश्वास व्यक्त केला. तर शिवसेनेच्या वाडा आणि जव्हार येथे झालेल्या बैठकीत जि.प. अध्यक्ष प्रकाश निकम आणि उपसभापती प्रदिप वाघ यांनी विक्रमगडची जागा शिवसेने घ्यावी अशी मागणी केल्याने युतीत ठिणगी पडू शकते असे चित्र आहे.

मुळात युतीमध्ये विक्रमगड विधानसभा ही पारंपरिक पद्धतीने भाजपकडे आहे. मात्र २०१४ मध्ये सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यानंतर शिवसेनेने भाजपला घाम फोडला होता. मात्र यात त्यांचा निसटता पराभव झाला होता. यानंतर मात्र ही जागा युतीमध्येच लढण्यात आली. यावेळी मात्र राष्ट्रवादीने मोठा विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर ही जागा शिवसेनेला मिळावी ही येथील शिवसैनिकांची मागणी आहे. मात्र हक्काची जागा भाजप सोडेल असे चित्र नाही. जिल्हा परीषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी वाडा येथे झालेल्या बैठकी दरम्यान मनोगत व्यक्त करताना सांगितले की भाजपकडून कार्यकर्ता सांभाळला जात असताना आपल्याकडून मात्र दुर्लक्ष होत आहे. कारण सध्या तब्बल दिडशे कोटींचा निधी आणला गेला असून ती सर्व कामे भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटण्यात आली आहेत.तसेच ठक्करबाप्पा योजनेचा निधीही भाजपच्याच ग्रामपंचायतींना देण्यात आला. यामुळे जर पालकमंत्री भाजपचे असतील तर कामे देताना ६०-४०टक्के असा फॉर्म्युला राबवावा जेणेकरून कार्यकर्ता स्वतःच्या पायावर उभा राहील, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी जिल्हा परिषदेत गरज नसताना सर्वपक्ष सोबत घेवून ज्या समित्यांचे वाटप करण्यात आले. यामुळेही कार्यकर्ता मजबूत करण्यात अडचणी येत असल्याबाबत त्यांनी सांगितले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -