Saturday, May 15, 2021
27 C
Mumbai
घर पालघर रेती उत्खननाला गावकर्‍यांचा विरोध

रेती उत्खननाला गावकर्‍यांचा विरोध

कोकण विभागीय आयुक्तांनी वसई खाडीत यांत्रिक पद्धतीने रेती उत्खनन करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला पाचूबंदर आणि किल्लाबंदर गावातून तीव्र विरोध केला जात आहे.

Related Story

- Advertisement -

कोकण विभागीय आयुक्तांनी वसई खाडीत यांत्रिक पद्धतीने रेती उत्खनन करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला पाचूबंदर आणि किल्लाबंदर गावातून तीव्र विरोध केला जात आहे. रेती उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होणार असून स्थानिक मच्छिमारांच्या उपजिविकेवरही संकट ओढावणार असल्याने हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा याठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा कोळी युवाशक्ती संघटनेने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून दिला आहे. पाचूबंदर आणि किल्लाबंदर ही गावे वसई खाडीकिनारी वसली आहे. येथील गावकर्‍यांचा मासेमारी हाच एकमेव रोजगार आहे. त्यावर येथील पंधरा हजार लोकांचे पोट अवलंबून आहे. पण, गेली वीस वर्षे वसई खाडीत अनधिकृतपणे अमर्याद रेती उत्खनन होत असल्याने किनार्‍याची दुर्दशा झाली असून मासळी व्यवसायावर मोठे संकट आले आहे. त्याविरोधात येथील गावकरी संघर्ष करत असतानाच कोकण आयुक्तांनी वसई खाडीत यांत्रिकी पद्धतीने मासेमारी करण्यास परवानगी देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

याविरोधात गावात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून कोरोनाची सर्व नियमांचे पालन करून कोळी युवाशक्तीचे अध्यक्ष मिल्टन सौदिया यांच्या नेतृत्वाखाली तीन पदाधिकार्‍यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून गावकर्‍यांच्या भावना सरकार दरबारी पोचवण्याचा प्रयत्न केला. समुद्रातून येणार्‍या महाकाय लाटांना थोपवून धरणारा सँडबार रेतीमाफियांनी उत्खनन करून उध्वस्त केला आहे. त्यामुळे किनार्‍याची मोठ्या प्रमाणावर धूप होऊ लागली आहे. किनारा खचल्याने दरवर्षी पावसाळ्यात उधाणात अनेक घरांमध्ये समुद्राचे पाणी शिरू लागले आहे. गावात ३०० हून अधिक मासेमारी बोटी आहेत. पण, किनार्‍याची वाताहात झाल्याने आता अवघ्या दहा बोटीही सुरक्षितपणे किनार्‍यावर ठेवता येत नसल्याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

रेल्वे पूलापासून सहाशे मिटर अंतराच्या परिघात रेती उत्खननास मनाई असतानाही रात्रीच्या वेळी बेकायदा रेती उत्खनन सुरु असल्याचे दिसून येते. मध्यंतरी पश्चिम रेल्वेचे तत्कालीन व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांनी रेती उत्खननामुळे रेल्वे पूलाला धोका असल्याचे राज्य सरकारला कळवले होते. पण, त्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. बेकायदा रेती उत्खननासाठी शेकडो बांगलादेशी मजूरांचा वापर केला जात आहे. वसई पोलिसांनी अनेकदा त्यांची धरपकड करून कारवाई केल्यानंतरही बांगलादेशी मजूरांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. बांगलादेशी मजूरांमुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहचू शकतो, याकडेही संघटनेने लक्ष वेधले आहे.

हेही वाचा –

यंदा भारतात ९८ टक्के मॉन्सूनचा अंदाज, कसा मोजला जातो पावसाचा अंदाज, काय आहेत मॉडेल्स ?

- Advertisement -