HomeपालघरVirar News: एकीकडे पाण्याबाबत इमारतींची तक्रार,दुसरीकडे पाणी गळती

Virar News: एकीकडे पाण्याबाबत इमारतींची तक्रार,दुसरीकडे पाणी गळती

Subscribe

रस्ता पूर्ण ओला राहत असल्यामुळे रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पालिकेने गळती काढून घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

विरार : वसई -विरार शहर महानगरपालिकेच्या पाणी नियोजनाच्या गलथान कारभारामुळे अनेक ठिकाणी पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेक इमारतीमध्ये पाणी मुबलक प्रमाणात पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या असतानाच नारंगी गावाकडे जाणार्‍या मार्गावर मागील ३० दिवसांपासून पाण्याच्या लाईनमधून गळती होत आहे. यामुळे रस्त्यावर हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी नाराजी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच रस्ता सातत्याने ओला असल्यामुळे अपघातही वाढले आहेत.

विरार पूर्वकडील नारंगी बायपास नारंगी गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर मागील ३० दिवसांपासून पालिकेची पाण्याची लाईन फुटली आहे. यामुळे या रस्त्यावर हजारो लिटर पाणी प्रतिमिनिटाला वाया जात आहे. पाण्याचा दबाब मोठा असल्यामुळे काही किलोमीटरपर्यंत पाणी रस्त्यावरून वाहून जात असल्याचे चित्र दिसून आले आहे. रस्ता पूर्ण ओला राहत असल्यामुळे रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पालिकेने गळती काढून घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -

वसई- विरार शहराला सुर्या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांतून २०० दशलक्ष लिटर्स, तर पेल्हार धरणातून १० आणि उसगाव धरणातून २० दशलक्ष लिटर्स तर एमएमआरडी प्रकल्पातून १६५ दशलक्ष लिटर्स पाण्याची मान्यता मिळाली आहे. मात्र त्यातून १०० दशलक्ष लिटर्स पाण्याची पूर्तता सध्यागत होत आहे. त्यातही पाण्याच्या गळती आणि चोरीचे प्रमाण जास्त झाल्याने हे २० टक्क्यांहून अधिक आहे. यामुळे शहरातील नागरिकांना पालिकेच्या हलगर्जीपणाचा फटका सहन करावा लागत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याच रस्त्यावर सकाळ- संध्याकाळ वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र पालिकेच्या पाण्याची लाईन लिकेज असल्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढ झाली आहे. तर पालिकेच्या वाढत्या पाणी गळतीमुळे शहरातील नागरिकांना अपुर्‍या पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे.

पालिकेवर प्रशासकीय राजवट असल्यामुळे नागरिक सुविधांपासून वंचित राहत चालला आहे. शहरात योग्य नियोजन निसल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी गळती वाढली आहे. जर पाणी गळती वाढली तर काही ठिकाणी पाण्याचा पुरवठा तुरळक प्रमाणत होईल.

- Advertisement -

– नितीन पवार , स्थानिक नागरिक


Edited By Roshan Chinchwalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -