Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरVirar News : रस्त्यांवर पुन्हा कचर्‍याचे साम्राज्य,नागरिकांच्या आरोग्याला धोका

Virar News : रस्त्यांवर पुन्हा कचर्‍याचे साम्राज्य,नागरिकांच्या आरोग्याला धोका

Subscribe

अनेक हॉटेल, खाद्य पदार्थाच्या गाड्यावाले, गृहसंकुलातील नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. या कचर्‍यामुळे नागरिकांना रस्त्यावर चालणे मुश्कील झाले आहे. दुर्गंधीयुक्त वातावरणात रस्ते अडकल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

विरार : वसई – विरार महानगर पालिका शहरातील कचरा नियमित उचलला जात असल्याचे दावे करत असली तरी शहरातील अनेक मार्गांवर कचर्‍यांचे ढीग निर्माण होत आहेत. रस्त्यांवरील कचर्‍याचे साम्राज्य पाहून पालिकेचे दावे फोल ठरत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील कचर्‍याची समस्या वाढत असताना पालिका मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.

स्वच्छ शहर अभियानाला स्वतः पालिकेनेच हरताळ फासण्याचे काम चालवले आहे,असे नागरिकांचे म्हणणे आहे. वसई -विरार महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे शहरवासीयांना याचा फटका सहन करावा लागत आहे. कचर्‍याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात साधारणतः दिवसाला ६०० टन हून अधिक कचरा निर्माण होत आहे. त्यात पालिका घन कचर्‍याच्या गाड्या कचरा उचलताना अनेक ठिकाणचा कचरा उचलत नाहीत. यात प्रामुख्याने रस्त्याच्या लगत असलेले कचर्‍याचे ढीग दुर्लक्षित केले जातात. यामुळे सातत्याने कचरा साचून मोठ मोठे ढीग तयार झाले आहेत. यात भटके जनावर, कुत्रे यांचा वावर वाढला आहे. या जनावरांमुळे कचरा इतरेतर पसरला जातो आणि सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी आणि रोगराईचे सावट घोंगावत आहे. या बाबत नागरिकांनी अनेक वेळा पालिकेला तक्रारी केल्या आहेत. पण पालिकेकडून केवळ आश्वासन दिले जाते. पण कचरा मात्र उचलला जात नाही असे नागरिकांनी बोलताना सांगितले आहे. तर दुसरीकडे पालिका शहरात दररोज साफ सफाई केल्याचे दावे करत आहेत. पण रस्त्यावरील कचर्‍याचे ढीग पाहता पालिकेचा दावा फोल ठरत आहे. अनेक हॉटेल, खाद्य पदार्थाच्या गाड्यावाले, गृहसंकुलातील नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. या कचर्‍यामुळे नागरिकांना रस्त्यावर चालणे मुश्कील झाले आहे. दुर्गंधीयुक्त वातावरणात रस्ते अडकल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

वसई- विरार परिसरातील विरार पूर्व कातकरी पाडा, कारगिल नगर, नालासोपारा पूर्वमधील मोरेगांव, प्रगती नगर, रहमतनगर, विजय नगर, संतोष भुवन, कारगिल नगर, शर्मा वाडी, बावसेतपाडा, वलईपाडा, पांडे नगर, गौराईपाडा, बिलालपाडा, श्रीरामनगर, धानिवबाग, वाकनपाडा, गांगडीपाडा, वाकनपाडा, चौधरी कंपाऊंड, रिचर्ड कंपाऊंड, वसई फाटा, नवजीवन, धुमाल नगर, सातिवली, भोयदापाडा, आदी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे.


Edited By Roshan Chinchwalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -